गिरणातून सोडण्यात आले पिण्यासाठी आवर्तन

Girna Dam
Girna Dam

पिलखोड (ता. चाळीसगाव) : गिरणा धरणातून पिण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन आज (शनिवार) सकाळी साडेसात वाजता सोडण्यात आले, अशी माहिती गिरणाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'ला दिली. आवर्तनामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

उन्हाची वाढती तीव्रता तसेच कोरडेठाक झालेले जलसाठ्यांमुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर भडगाव, पाचोरा शहरातून जिल्हाधिकाऱ्यांकडे गिरणाच्या आवर्तनाची मागणी झाली होती. त्यानुसार आज(2 जून) गिरणा धरणातून 1 हजार 500 क्यूसेक एवढे बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात आले. अशी माहिती गिरणाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी ' सकाळ'ला दिली. 

आवर्तन पिण्यासाठीच असल्याने त्याचा शेतीसाठी वापर करू नये, तसे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी सांगितले. गिरणातून आवर्तन सुटणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com