पोहेगाव ते अंतापूर दिंडीचे सटाण्यात स्वागत

satana
satana

सटाणा : हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील जय दावल मलिक बाबा भक्त परिवारातर्फे पोहेगाव ते श्री क्षेत्र अंतापूर (ता. बागलाण) दरम्यान सालाबादाप्रमाणे काढण्यात आलेल्या दावलशहा बाबांच्या दिंडीचे आज मंगळवार (ता.१४) रोजी सटाणा शहरात आगमन होताच भाविकांतर्फे भव्य स्वागत झाले. अग्रभागी घोडा, भगवे वस्त्र परिधान केलेले कावडधारी भक्त, ढोल ताशांचा गजर व खांद्यावर सजविलेली पालखी घेतलेले भाविक हे प्रमुख आकर्षण होते. यंदा पालखी दिंडीचे २७ वे वर्ष आहे. 

पोहेगावहून निघालेल्या पायी पालखी दिंडीचे आज सकाळी आठ वाजता शहरातील सुभाष रोड क्रमांक १ मध्ये आगमन झाले. यावेळी सुभाष रोड मित्र मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीत दिंडीचे स्वागत करण्यात आले. मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पालखीतील दावलशहा बाबांच्या पादुका, झोळी, पावडी, काठी, अश्व तसेच दावलशहा बाबांच्या प्रतिमेची विधिवत पूजा केली. पायी पालखी दिंडीत सहभागी असलेल्या भाविकांना मंडळातर्फे मसाला दुध, केळीम, सोयाबीन पुलाव व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे मनोज मुंडावरे, समको बँकेचे संचालक जगदीश मुंडावरे, किशोर बोरसे, दिनेश देवरे, मनोज निकुंभ, तुषार सूर्यवंशी, कुणाल जाधव, दीपक सोनवणे, जॉनी सोनवणे, लवेश बोरसे, तुषार ततार आदींनी सहकार्य केले. 

यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या पायी दिंडीने देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टतर्फे दिंडीचे स्वागत करण्यात आले. चौकाचौकात दिंडीचे आगमन होताच पालखीचे पूजन करण्यासाठी नागरिकांची चढाओढ लागली होती. दुपारी बारा वाजता श्रमिकनगरमध्ये दत्तू बैताडे मित्र मंडळातर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत दिंडीचे स्वागत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दत्तू बैताडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. गेल्या बारा वर्षांपासून या मंडळातर्फे दिंडीला जेवण देण्याची परंपरा आजही अखंडित सुरु आहे. यावेळी पवन सांगळे, अतुल कोठावदे, आकाश सांगळे, मिथुन सूर्यवंशी, प्रवीण बगडाणे, विजय कुमावत, केदा भामरे, रवी बैताडे, मंगेश बैताडे, अजय बैताडे, नगरसेवक दीपक पाकळे, रवींद्र येवला, विकास कर्डीवाल, विजय कर्डीवाल आदींनी सहकार्य केले. दुपारनंतर विंचूर- प्रकाशा राज्य महामार्गाने दावलशहा बाबांचा जयघोष करीत पालखी दिंडी श्री क्षेत्र अंतापूरकडे रवाना झाली. येत्या गुरुवारी (ता.१६) रोजी दिंडी अंतापूर येथे पोचणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com