काय आहे थर्टी फर्स्टचा प्लॅन?

What is the Thirty First Plan?
What is the Thirty First Plan?

गोरगरिबांना मदत, वृक्षारोपण, रक्तदान करून होणार स्वागत

सोलापूर : वर्ष संपत आलंय.. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त काहीतरी हटके करण्यासाठी प्लॅन होताहेत.. कोणी निसर्गाच्या सान्निध्यात जाताहेत, तर कोणी रस्त्यावर भटकणाऱ्या याचकांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून कपडे देणार आहेत. तर कोणी वृक्षारोपण, रक्तदान करणार आहेत.

थर्टी फर्स्टच्या रात्री म्हणजे 31 डिसेंबर रोजी संध्याकाळनंतर सगळीकडेच एक वेगळेच वातावरण असते. मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवून, पार्टी करून, नाचत नाचत नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. एकीकडे असे चित्र असले तरी काही मंडळी नववर्षाच्या स्वागतानिमित्त खरंच हटके प्लॅन करत आहेत. इको फ्रेंडली क्‍लबचे सदस्य महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर सर करून नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. तर हिंदवी परिवाराच्या वतीने 31 डिसेंबर रोजी नॉर्थकोट प्रशालेसमोरील झाडांना पाणी घालण्यात येणार आहे. काही मंडळींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. सिद्धेश्‍वर महिला पॉलिटेक्‍निकमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

गरजूंना उबदार कपडे
आस्था संस्थेच्या वतीने यंदाही नववर्षाच्या पूर्वसंध्येला "चलो एक कदम मानवताकी ओर..' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रस्त्यावर भटकणाऱ्या याचकांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून शाल, ब्लॅंकेट, चादर, स्वेटर देण्यात येणार आहेत. 31 डिसेंबर 2016 रोजी रात्री 10 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टा येथे हा उपक्रम होईल. तुमच्या घरातील वापरात नसलेली शाल, ब्लॅंकेट स्वच्छ धुवून किंवा मग नवीन ब्लॅंकेट देता येईल. उपक्रमात सहभागी होण्यासाठी जगदीश पाटील (9890995467) यांच्याशी संपर्क साधता येईल.

तुम्ही कसे करणार स्वागत?
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त तुम्ही काय करणार आहात..? तुमचे उपक्रम "सकाळ'शी शेअर करा.. www.facebook.com/solapursakal च्या पेजवर तुम्ही मेसेज करू शकता.. चला तर मग शेअर करा तुमचे नववर्षाचे प्लॅनिंग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com