सकाळ अॅग्रोवन व महाधनतर्फे सोनगीरला शेतकरी मेळावा

songir
songir

सोनगीर (धुळे) : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करुन शेतकर्‍यांनी चांगले बियाणे, योग्यवेळी कापूस लावणी, दोन पिकांत योग्य अंतर, पाणी लावण्याचे नियोजन, आणि पिक वाढीच्या विविध टप्प्यांवर खते लावणे आदीमुळे कापसाचे चांगले उत्पादन मिळू शकते. अशी माहिती धुळ्याच्या कृषी विज्ञान केंद्रांचे कृषी विद्यावेत्ता जगदीश काथेपुरी यांनी दिली. सकाळ अॅग्रोवन तथा महाधन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रिती मंगल कार्यालयात  शेतकरी मेळावा व पीक परिसंवाद तथा महाधन ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी सुदाम श्रीराम पाटील उपस्थित होते. 

प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी ट्रेडर्सचे मालक नंदकुमार चौधरी, गणेश चौधरी उपस्थित होते. अॅग्रोवन हा शेतकऱ्यांचा जवळचा मित्र असून शेतीतून विकासाची गंगा वाहावी व शेतकऱ्यांना शेतीविषयक वस्तुनिष्ठ मार्गदर्शन मिळावे यासाठी अॅग्रोवनतर्फे वर्षभर चर्चासत्रे सुरू असतात. तसेच व्याख्यान आयोजित करण्यात येते. शेतकरी व अॅग्रोवनचे घट्ट नाते विणले गेले आहे. त्याचीच वृध्दी व्हावी व पावसाळ्यात शेतकर्‍यांशी भेट होऊन हितगुज साधला जावा यासाठी येथील प्रिती मंगल कार्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 

चर्चासत्रात मुख्य विषय कापूस लागवड व व्यवस्थापन हा होता. काथेपुरी म्हणाले की शासनाने कापसाचे बियाणे 20 मे नंतर विक्री करावी असे आदेश दिले. कारण 25 मे नंतर उन्हाची तीव्रता कमी होते. त्यामुळे कापूस मान टाकत नाही. कापूस लावणीपुर्वी शेतीतील मातीचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पिकांची व बियाणांची निवड करावी. एका शेतात दरवर्षी एकच पीक घेऊ नये. पाण्याचे नियोजन करून ठिबक सिंचन करावे. लावणी करताना मजूरांनी किती बियाणे लावले हे पहाण्याऐवजी योग्य अंतरावर लावले की नाही यावर देखरेख ठेवावी. 

कृषी विज्ञान केंद्राचे पंकज पाटील यांनी सांगितले की भारतात निर्माण होणाऱ्या एकूण कीटकनाशकांपैकी सर्वाधिक कीटकनाशके कापसावर मारली जातात. त्यामुळे कापसाच्या कीडने अन्य पिकांकडे मोर्चा वळवला असून सर्वच पिकांवर आता फवारणी करावी लागत आहे. कीटकनाशकांचा अतिरेक टाळून शेतातील पिके दरवर्षी बदलावी. बीटी कापसाने सुरवातीला भरपूर उत्पन्न दिले. पण पुढे बोंडअळीचा प्रभाव वाढला. अळींना खाण्यासाठी वेगळे नाॅनबिटी बियाणे बीटीसोबत मिळते. त्याचाही वापर व्हावा. 

महाधन स्मार्टकेम टेक्नॉलॉजीजचे (पूणे) गोरखनाथ बुधवंत यांनी महाधनच्या उत्पादनाची माहिती दिली. महाधनने सर्वच पीकांची जोमाने वाढ व भरघोस उत्पन्नासाठी खतांची शृंखला बाजारात आणली आहे. दाणेदार युरिया पिकांना लाभदायक ठरतो. एल. बी. चौधरी यांनी सुत्रसंचलन केले. 

महाधनचे विपणन व्यवस्थापक विकास खैरनार यांनी आभार मानले. तुषार कापडणीस, हेमंत पाटील, प्रदीप पाटील यांचेसह सकाळ ग्रुपचे अॅग्रोवन व स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांनी संयुक्तपणे केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com