नाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन 

नाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन 

नाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌ कुंभनगरी म्हणूनही ओळख असलेल्या नाशिकमधील कला व कौशल्यांनी जागतिक मानांकन मिळवलयं. गेल्या सहा महिन्यांत ढोलवादनापासून, अध्यापन पद्धती, संग्रह, रांगोळी ते आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी वारली चित्रशैली अशा विविध बाबींच्या दहाहून अधिक जागतिक विक्रमांची नोंद झालीय. 

नाशिकची सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख दिवसेंदिवस अधिक ठळक होऊ लागलीय. इथले चित्रपट-नाट्य कलावंत, चित्रकार, शिल्पकार, रांगोळी कलावंतांनी नाशिकच्या आकर्षणात भर घातली आहे. रांगोळीने सण-उत्सवांच्या जोडीला जागतिक स्तरावर मजल मारली. नाशिकच्या ढोलचा दणदणाट सर्वत्र परिचित असतानाच स्वातंत्र्यदिनी ढोलने महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई शिखरावर ढोलवादन करत विक्रम प्रस्थापित केला. प्राणी, फळे, फुले, खेळ अशा वेगवेगळ्या आकारांतील खोडरबर, शिवकालीन, पेशवेकालीन अडकित्ते, पानाचे डब्बे यांनीही जागतिक स्तरावर आपले वेगळेपण सिद्ध केले. 

विक्रम नोंदीचे कामकाज 
वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड या लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी कार्यरत आहेत. सुरवातीला संकल्पना तपासली जाते. अगोदर कोणी असे विक्रम केले आहे काय, याची पडताळणी होते. मग ऑनलाइन कागदपत्रांची पूर्तता होते. पुढे सादरीकरणाचे परीक्षण केले जाते. त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. विक्रमाचे जतन केले जाते. या साऱ्या प्रक्रियांमधून नाशिकमध्ये झालेले विक्रम लक्ष वेधून घेताहेत. 

जागतिक विक्रमाच्या नोंदी 
- आसावरी आणि सतीश धर्माधिकारी दांपत्याने अवयवदान संकल्पना घेऊन अडीच हजार चौरस फुटांची साकारली रांगोळी 
- नीलेश देशपांडे यांनी तीनशे मिनिटांत रांगोळीतून साकारले 151 रूपांतील श्रीगणेश 
- दर्शन वानखेडे यांनी सलग 12 तास, 12 विषय, 12 इयत्ता, 12 शिकविण्याच्या पद्धती वापरून केले अध्यापन 
- श्रद्धा कराळे हिने एकटीने दोन हजार चौरस फुटांची रांगोळी सहा तासांत केली पूर्ण 
- कळसूबाई शिखरावर सिंहगर्जना ढोलपथकाने केले वादन 
- नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांतर्फे सव्वाकोटी सूर्यनमस्कार 
- माघी गणेशोत्सवानिमित्त 125 महिलांनी सलग सहा तास गणपती भजनांचे केले गायन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com