राज्यातील 154 गावांना यंदा तंटामुक्तीचा पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नाशिक - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत 2015-16 साठी राज्यातील 154 गावे तंटामुक्त गावे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यातील 11 गावांची विशेष शांतता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. चिंचोली (ता. सिन्नर) गावाला हा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय 14 गावांचा तंटामुक्त गावांमध्ये समावेश आहे. 

नाशिक - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत 2015-16 साठी राज्यातील 154 गावे तंटामुक्त गावे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यातील 11 गावांची विशेष शांतता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. चिंचोली (ता. सिन्नर) गावाला हा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय 14 गावांचा तंटामुक्त गावांमध्ये समावेश आहे. 

गावे तंटामुक्त होण्यासाठी 15 ऑगस्ट 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 18 हजार 993 गावांना तंटामुक्त पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच एक हजार 298 गावांना विशेष शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 15 ते 30 ऑगस्ट 2016 या कालावधीत राज्यातील 154 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन मोहिमेत सहभाग घेतला. मोहिमेंतर्गत 

समितीने भविष्यात तंटे निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गावात दाखल असलेल्या दिवाणी, महसुली व इतर तंट्यांची माहिती संकलित केली. दाखल आणि नव्याने निर्माण झालेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने मिटविण्याची 

कार्यवाही केली. 2001 च्या जनगणनेप्रमाणे गावाच्या लोकसंख्येनुसार पुरस्कारांची रक्कम मिळणार आहे. विशेष शांतता पुरस्कार मिळालेल्या गावांना पुरस्कार रकमेच्या 25 टक्के इतकी वाढीव रक्कम मिळणार आहे. मोहिमेमध्ये पात्र ठरलेल्या गावांना तीन कोटी 95 लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहे. 

तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेली जिल्ह्यातील गावे अशी ः शिवडी, गाजरवाडी, शिवरे, चापडगाव (ता. निफाड), आघार खुर्द, कौळाणे निंबायती, वजीरखेडे, विराणे (ता. मालेगाव), साळसाने, आसरखेडे, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, पाथरशंबे (ता. चांदवड), वडगाव बल्लेगाव (ता. येवला). तंटामुक्त गावांमध्ये सर्वाधिक 34 गावे यवतमाळ जिल्ह्यातील, त्याखालोखाल 15 गावे वाशीम, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांतील प्रत्येकी 13 गावे आहेत. 

Web Title: This year 154 villages in the state award tantamukti