यंदाच्या अंदाजपत्रकाला कात्री?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नाशिक - महापालिकेचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट टप्प्यात येत नसल्याने यंदाच्या अंदाजपत्रकाला कात्री लागण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत सर्व कर मिळून सातशे कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. पुढील तीन महिन्यांत किमान चारशे कोटींचा महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. परंतु निवडणुकीसाठी सर्व कर्मचारी व्यस्त राहणार असल्याने वसुलीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

महापालिका प्रशासनातर्फे २०१६-१७ साठी एक हजार ३७५ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. स्थायी समितीने त्यात साडेतीनशे कोटी रुपयांच्या कामांची भर टाकली. त्यानंतर महासभेने त्यात सुमारे ४० कोटींची अतिरिक्त कामे सुचविल्याने अठराशे कोटी रुपयांच्या वर अंदाजपत्रक पोचले होते. गेल्या वर्षी सिंहस्थ असल्याने नगरसेवकांच्या कामांना कात्री लावली होती. परंतु, या वर्षी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांनी स्वनिधीची जोरदार मागणी केल्यानंतर प्रत्येकी पन्नास लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. विकासकामांचा धडाका सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबरनंतर कामांना मंजुरी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आयोगाच्या निर्णयामुळे निधीचे नियोजन करणाऱ्या प्रशासनाला दिलासा मिळाला होता. दुसरीकडे अपेक्षित महसूल प्राप्त न झाल्याने अंदाजपत्रकाला कात्री लावण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत सातशे कोटी रुपये वसूल झाले आहेत. घरपट्टीचे ११० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६४ कोटी, तर पाणीपट्टीतूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.

Web Title: This year's budget