येवला मर्चंन्टस् बँकेला १ कोटी ७१ लाखाचा विक्रमी नफा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

येवला : जिल्ह्यातील पहिली व येथील अग्रगण्य दि येवला मर्चन्टस् को-ऑप बँकेला ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख ४६ हजार रुपये ढोबळ नफा झाला आहे. सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करण्यात बँक यशस्वी झाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष पंकज पारख,उपाध्यक्ष राजेश भांडगे, जनसंपर्क संचालिका पद्मा शिंदे यांनी दिली.

येवला : जिल्ह्यातील पहिली व येथील अग्रगण्य दि येवला मर्चन्टस् को-ऑप बँकेला ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख ४६ हजार रुपये ढोबळ नफा झाला आहे. सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करण्यात बँक यशस्वी झाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष पंकज पारख,उपाध्यक्ष राजेश भांडगे, जनसंपर्क संचालिका पद्मा शिंदे यांनी दिली.

बँक चालू आर्थिक वर्षात जुलै २०१८ मध्ये हिरक महोत्सवी वर्षात (७५ वर्षे) पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात येणार असून या हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाराज यांना आमंत्रित केले आहे. 

बँकेचा आर्थिक वर्षात रिझर्व फंड व इतर निधी  १९ कोटी २९ लाख असून ठेवी १६४ कोटी  आहेत.बँकेची गुंतवणुक १०२ कोटीची असून बँकेने कर्जपुरवठा ६८ कोटी २९ लाख रुपये केलेला आहे. बँकेचे खेळते भांडवल २११ कोटी १७ लाख रुपये,निव्वळ एनपीए. १.३२ असून थकबाकी ९.१२ टक्के इतकी आहे. 

नोटबंदीच्या काळात बँकेने अन्य सर्व बँकांच्या तुलनेत सर्वोत्तम ग्राहक सेवा पुरवली असून त्या बद्दल बँकेचे सर्वसाधारण ग्राहक आणि हितचिंतक समाधान व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणे कॅशलेस पेमेंटच्या बाबतीतही बँकेने अग्रेसर कामगिरी केली असून संपलेल्या आर्थिक वर्षात जवळपास ४ हजार खाती नवीन उघडण्यात आली आहेत. बँकेवर वाढत्या विश्‍वासाचे हे प्रतिक आहे. त्याचप्रमाणे ब्रँच कनेक्टिव्हिटी सुरु केल्याने बँकेच्या कारभारात गतिमान व लक्षणीय सुधारणा झाली आहे.

आगामी वर्षात २ एटीएम सेंटर शहरात सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पारख यांनी सांगितले. बँकेच्या या गौरवशाली व यशस्वी प्रगतीच्या वाटचालीत संचालक सुशिल गुजराथी,धनंजय कुकलर्णी, सुधीरकुमार गुजराथी, बंडू क्षीरसागर, मनिष काबरा, विजयकुमार चंडालिया, सुरज पटणी, अरुण काळे, डॉ. यशवंत खांगटे, मनोज दिवटे, हर्षाबेन पटेल, विजया परदेशी, संजय श्रीश्रीमाळ, विजय देशपांडे, व्यवस्थापक अतुल पटेल, अंदरसूल शाखाधिकारी अरविंद जोशी, अधिकारी व कर्मचारी याचे योगदान आहे. सर्वांचे आभार मानुन पुढील काळांतही सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य बँकेला मिळेल,असा विश्‍वास पारख व सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: yeola merchant bank profit 1 crore 71 lack