योगिताने रौंदळचा थक्क करणारा जीवन प्रवास

yogita-raindale
yogita-raindale

आश्वी - संगमनेर येथील आधार फाऊंडेशनच्या मदतीने एका सर्वसामान्य कुटूंबातील योगिता रौंदळ या युवतीने वैद्यकिय शिक्षण पूर्ण तर केलेच, शिवाय मैत्रिणीच्या महतिने आपल्या आईचे दूसरे लग्न देखीव तीने लावून दिले. 

अगदी चित्रपटात शोभावी अशी ही घटना, संगमनेर तालुक्यात प्रत्यक्षात घडली. मुळची नाशिक जिल्ह्यातील योगिता रौंदळ ही मुलगी वडीलांनी फारकत दिल्याने, तिच्या आई बरोबर संगमनेर तालुक्यात उपजिविकेसाठी आली होती. तेथे राहून आदिवासी वसतीगृहात मोलमजुरीचे काम करुन चरितार्थ चालवित होती. मुळातच हुशार असलेल्या योगिताला बारावी नंतर संगमनेर मधील डॉ. इथापे मेडिकल कॉलेजमध्ये बी.एच.एम.एस.साठी प्रवेश मिळाला. आजीला मिळत असलेल्या निवृत्ती वेतनावर पहिली तीन वर्षे निर्विघ्नपणे पार पडली. मात्र दुर्दैवाने चौथे वर्ष सुरु असताना, आजीचा मृत्यू झाला. शिक्षणासाठी मिळणारा पैशांचा एकमात्र स्त्रोत आटल्याने पुढील शिक्षण थांबणार असल्याच्या चिंतेने तिला घेरले. समस्येवर उपाय सापडत नव्हता. मात्र तिचे नशिब जोरावर होते, संगमनेर मधील वैद्यकिय व्यावसायिक डॉ. प्रसाद रसाळ यांच्या इमारतीत भाडेतत्वावर राहणारी योगिताची वर्ग मैत्रिण डॉ. स्वाती जेजुरकर या विद्यार्थिनीकडून त्यांना ही अडचण समजली. डॉ. रसाळ यांनी आधार फाऊंडेशनच्या शिलेदारांशी चर्चा केली आधार दत्तक पालक योजनेत तिचे नाव घेऊन, स्वतःबरोबरच बहिण, मित्र, समव्यवसायिक यांच्या सहकार्यातून योगिताची शेवटच्या वर्षाची सुमारे ४० हजार फी भरली. इतकेच नव्हे तर, आधारच्या आग्रहामुळे मालपाणींनी प्रथमच वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला आर्थिक मदत केली व तिचे शिक्षण सुरु झाले. स्वतःची पुस्तके खरेदी करणे शक्य नसल्याने, मैत्रिणींच्या वह्या, पुस्तकांचा अभ्यासासाठी वापर करणारी योगिता इंटर्नशिप संपल्या नंतर डॉक्टर पदवी घेऊन बाहेर पडली.

या सर्व घडामोडीत तिची जीवलग मैत्रिण असलेल्या स्वातीचा मोठा वाटा आहे. स्वातीचे जवळचे नातलग रयत शिक्षण संस्थेतील प्राचार्य निवृत्ती सोनवणे ( ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव ) विधुर होते. या दोघी मैत्रिणींनी योगिताची आई व प्रा. सोनवणे या दोन जीवांची भेट घडवली. इतकेच नाही तर त्यांचा विवाहही लावून देण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने योगिताला वडिल मिळाले. सध्या योगिता तिच्या आई वडिलांबरोबर येवला येथे राहते. गेल्या आठवड्यात त्यांनी आधार फाऊंडेशनला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेट दिली. त्यांनी देऊ केलेली छोटीशी मदत नाकारीत तिच्या सारख्या अडचणित असलेल्या पाच जणांना शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे अभिवचन आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे यांनी मात्र घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com