‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे समर यूथ समिट

Young-Inspirators-Network
Young-Inspirators-Network

जळगाव - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखवण्याचा उमेदीचा काळ. शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी गप्प बसू देत नाही. या ऊर्मीलाच सुसंघटित शिक्षणाची जोड देत तरुण पिढीला शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने महाविद्यालयीन तरुणाईसाठी १६ मे ते १६ जून दरम्यान राज्यातल्या बारा शहरांमध्ये ‘यिन समर यूथ समिट’ आयोजित केली आहे.

युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना भविष्यातील शैक्षणिक संधींचा वेध घेणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट’मधील पहिली परिषद १६ मे पासून मुंबईत होत आहे.

मुंबईसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला, नगर, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव येथील दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यिन या व्यासपीठाच्या माध्यमातून या परिषदा होत आहेत. या परिषदांसाठी स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या समिटसाठी पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी- चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले, अभि ग्रुप ऑफ कंपनीज हे सहप्रायोजक आहेत.

परिषदेत सहभागी होणाऱ्या यिनच्या सदस्यांना निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रत्येकी रु. २९९ (एक वेळच्या भोजन व्यवस्थेसाठी रु. १९९), तर सदस्येतरांसाठी रु. ४९९ शुल्क (एक वेळच्या भोजन व्यवस्थेसाठी रु. ३९९) आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना परिषद किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून यिन या पद्धतीच्या शिबिरांचे आयोजन करत असून, या आधीच्या शिबिरांमध्ये राज्यभरातील अनेक नामवंतांनी तरुणांना मार्गदर्शन केले आहे.

आजचा युवक उद्याच्या सशक्त व समृद्ध भारताचा शिल्पकार आहे. युवकांना योग्य दिशा देणारे व मार्गदर्शन करणारे यिन व्यासपीठ आहे. यिनच्या माध्यमातून युवकांच्या सक्षमीकरणाच्या कार्यात कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी युवावर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी उत्सुक आहे.
- सुनील पाटील, संचालक, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी

 यिनतर्फे घेण्यात येणारा समर यूथ समिट हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सामाजिक तसेच वैयक्तिक जीवनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. विद्यार्थ्यांना या समिटमुळे नक्कीच फायदा होईल.
- अमोल नहार, संचालक, हॅशटॅग क्‍लोदिंग

 उद्याचा युवक या संकल्पनेकडे घेऊन जाणारे व युवकांना उद्योजकतेची योग्य दिशा देणारे व्यासपीठ म्हणजे समर यूथ समिट. भावी उद्योजकांची सक्षम पिढी घडविण्यास या समिटचा निश्‍चितच उपयोग होईल.
- विशाल चोरडिया, संचालक, स्ट्रॅटेजी आणि मार्केटिंग, सुहाना, प्रवीण मसालेवाले

आदर्श विचार व विचारवंतांच्या सान्निध्यात समाजाचे संगोपन व पुनर्निर्माण झाले तर भारताचे गतवैभव आपण पुनश्‍च निर्माण करू शकू. ‘सकाळ यिन’चा या वर्षीचा उपक्रम या वैचारिक क्रांतीची सुरवात म्हणून ओळखला जाईल. यासाठी लाखोंच्या संख्येने आपणही या क्रांतीचे दूत बना व भारत निर्माणाच्या दृष्टीने एक पाऊल टाका.
- नीलय मेहता, संस्थापक, नीलय ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com