पिंप्राळ्यातील रहिवासी तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

शेती कर्ज, आजारपणाला कंटाळून निर्णयाची चर्चा 
जळगाव - पिंप्राळ्यातील गांधी चौकातील रहिवासी तरुणाने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. चंदन भाऊराव महाजन (मूळ रा. खिर्डी, ता. रावेर, वय २९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड व पोटाच्या आजाराला कंटाळून या तरुणाने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची नातेवाइकांमध्ये चर्चा आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

चंदन महाजन यांची खिर्डीत वडिलोपार्जित शेती आहे. लग्नानंतर शेतीसह फायनान्स कंपनीत नोकरी करावी म्हणून पत्नीसह येथील पिंप्राळ्यातील गांधी चौकात रवींद्र पाटील यांच्या घरात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून भाड्याने राहण्यासाठी आले होते. पोटाच्या आजारामुळे त्यांना नेहमी हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागत असल्याने ते सध्या घरीच होते. आज सकाळी पत्नी नेहा पिंप्राळ्यात राहणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी चंदन घरात झोपलेले होते. सकाळी साडेदहाला नेहा घरी परतल्यावर त्यांना उठवण्यासाठी खोलीकडे गेल्यावर चंदन यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. आक्रोश करीतच नेहा बाहेर मदतीसाठी धावल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांना घटना कळविण्यात आल्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे काशिनाथ कोळंबे, किरण पाटील घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली उतरविल्यावर तो विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

दोन लाखांचे कर्ज अन्‌ आजार
खर्डी येथील वडिलोपार्जित शेती व्यवसायासाठी चंदन महाजन यांनी दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीसोबतच आजारपण आल्याने गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याची माहिती कुटुंबियांतर्फे देण्यात आली.