‘प्रभाकर गोटूं’ना जि. प. गटाची संधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

जळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या जळगाव पंचायत समिती गणांच्या आरक्षणात सभापती हिराबाई मोरेंचा गण खुला झाला आहे. शिवसेनेचे  प्रभाकर गोटू सोनवणेंचा म्हसावद गण राखीव झाला. मात्र, जिल्हा परिषदेचा म्हसावद- बोरनार गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांना त्यात  उमेदवारीची संधी मिळणार आहे. आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट झाल्याने काही गणांमध्ये निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.

जळगाव पंचायात समिती गणासाठी आज जिल्हा पत्रकार संघाच्या भंवरलाल जैन सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसिलदार अमोल निकम यावेळी उपस्थित होते. प्रारंभी तहसिलदार निकम यांनी आरक्षणाच्या निकषांची माहिती दिली. त्यानंतर भूमी भाटीया या मुलीच्या हस्ते आरक्षण काढण्यात आले. यात विद्यमान सभापती शिवसेनेच्या हिराबाई सुनील मोरे यांचा कानळदा गण सर्वसाधारण खुला झाला आहे, त्यामुळे आता या गणात मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण होणार आहे. तर शिवसेनेचे प्रभाकर गोटू सोनवणे यांचा म्हसावद गण नागरिकांच्या मागासप्रवर्ग महिला गटासाठी राखीव झाला आहे. या गणातून सोनवणे यांची संधी गेली असली तरी त्यांच्या दृष्टीने एक आनंदाची बाब आहे, जिल्हा परिषदेचा म्हसावद- बोरनार गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांना आता जिल्हा परिषदेत गटात संधी मिळणार आहे.

Web Title: zp election reservation draw in jalgav

टॅग्स