दहावीच्या विद्यार्थ्यांना वेगळीच धास्ती....वाचा काय आहे कारण

 10th students in fear .... read what is the reason
10th students in fear .... read what is the reason

नागपूर  : अकरावीच्या प्रवेशासाठी दरवर्षी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा करोनाच्या संकटाने या प्रक्रियेवर गडांतर येईल काय? असा सवाल आता पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात घोंगावत आहे. दहावीचा निकाल लांबला असून अद्याप अकरावीच्या प्रवेशासाठी अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात झालेली नाही.

शहरातील 190 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 58 हजार 240 जागांचा समावेश आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्यात लागतो. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशास जून महिन्यात सुरुवात होते. गेल्या तीन वर्षांपासून राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यात सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून अर्जाचा पहिला टप्पा भरुन घेतल्या जातो.

निकालानंतर अर्जाचा दूसरा टप्पा भरण्यात येतो. यानंतर समितीमार्फत अकरावीच्या प्रवेशाची यादी टक्‍केवारीच्या आधारावर प्रकाशित करुन महाविद्यालयांना जागेचे अलॉटमेंट करण्यात येते. राज्यभरात दहावीसाठी जवळपास 16 लाखावर विद्यार्थी नोंदणी करतात. यापैकी जवळपास 75 ते 80 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. राज्यभरातील दोन हजारावर महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

राज्यात करोनाचे सावट गडद असल्याने शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी ऑगस्ट महिना सांगितला असला तरी, येणाऱ्या काळात ही परिस्थिती कितपत सुधारेल त्याच आधारावर शाळा सुरू होण्याबद्दल बोलता येणे शक्‍य नाही. त्यामुळे निकालाआधी पहिला टप्पा भरण्यासाठी आणि निकालानंतरही नोंदणी करण्यासाठी केंद्रावर विद्यार्थी कसे जाणार हा प्रश्‍न आहे.


निकालावरच अद्याप सरकारकडून काही आलेले नाही. त्यामुळे अकरावीतील प्रवेश प्रक्रियेबाबत काय बोलावे कळत नाही. ऑनलाइनमध्ये बराच त्रास होत असल्याने यावर्षी प्रक्रिया ऑफलाइन ठेवल्यास विद्यार्थ्यांना जास्त सोयीचे ठरेल. त्यातून सोशल डिस्टन्सिग पाळता येणे अधिक सुलभ होईल.
तेजश्री दातारकर, पालक


अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइनच राबविण्याची गरज आहे. ऑनलाइनमध्ये विद्यार्थ्यांना अधिकचे पैसे आणि वेळ वाया जातो. 1997 च्या नियमानुसार महाविद्यालयात गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. आता ही यादी विभागाला ऑनलाइन देण्यात येईल. हवे तर त्यात कुठलाही घोळ होऊ नये यासाठी प्रवेशानंतर महाविद्यालयांची तपासणी करण्यात यावी.
रविंद्र फडणवीस (केंद्रीय प्रवेश समिती सदस्य)

एकूण जागा -58,840
केंद्रीय समितीमार्फत प्रवेश - 30,009
आरक्षित जागांचे प्रवेश - 7,529
एकूण प्रवेश - 37,558
रिक्त जागा - 21,282
प्रवेशाची टक्केवारी - 51.04

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com