जानकर विरोधी पक्षांच्या रडारवर 

प्रशांत बारसिंग : सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 12 डिसेंबर 2016

नागपूर : देसाईगंज (जि. गडचिरोली) नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी अडचणीत सापडलेले दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करून अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे. 

नागपूर : देसाईगंज (जि. गडचिरोली) नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी अडचणीत सापडलेले दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करून अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे. 

नोटाबंदी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन पहिल्या आठवड्यात सरकारला जेरीस आणणाऱ्या विरोधी पक्षाला जानकर यांचा मुद्दा हाती लागला आहे. कॉंगेस उमेदवाराचा अर्ज बाद करून आपल्या उमेदवाराला कपबशी हे चिन्ह द्यावे यासाठी जानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावल्याची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत जानकर यांना सुरवातीला नोटीस बजावली आणि त्यानंतर देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना एका कॅबिनेट मंत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने विरोधी पक्ष जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरण्याची शक्‍यता आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात तुलनेने मागास असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर जास्त चर्चा होते. मात्र गेल्या आठवड्यात पाचपैकी तीन दिवसात जेमतेम कामकाजाला मिळाले. या तीन दिवसात नोटाबंदी, मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी आरक्षण आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (अट्रोसिटी) दुरुपयोग या मुद्द्यांवर चर्चा झाली. येत्या डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. त्यामुळे चालू आठवडा हा अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. परिणामी या आठवड्यात विदर्भ-मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री पदासह महत्त्वाची खाती विदर्भाला मिळूनही गेल्या दोन वर्षात विदर्भाच्या विकासात फारशी भर पडली नसल्याची टीका विरोधी पक्षाकडून होण्याची शक्‍यता आहे. 

विदर्भासाठी पॅकेज? 
गेल्या काही वर्षांपासून हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विदर्भासाठी पॅकेज जाहीर करण्याचा पायंडा पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेली दोन वर्ष हा पायंडा चुकवला नाही. सर्व विभागातील महत्त्वाच्या योजना आणि त्यांचा निधी एकत्र करून पॅकेज घोषित केले जाते. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात सरकार काय पॅकेज जाहीर करणार आणि विदर्भातील सिंचन, रस्ते, आरोग्य तसेच इतर पायाभूत सुविधांसाठी किती निधी मिळणार याची उत्सुकता वैदर्भीय जनतेला आहे. 

बुधवारी मराठा मोर्चा 
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी(ता.14) मराठा कुणबी मूक मोर्चा अधिवेशनावर धडकणार आहे. गेल्या काही महिन्यात गर्दीचे नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या मराठा मूक मोर्चाला नागपुरात मोठा प्रतिसाद मिळेल, अशी आयोजकांची अपेक्षा आहे. 
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाची सद्यःस्थिती विशद करताना फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे. अट्रोसिटी कायदा रद्द करणे सोडाच तो सौम्य करणे अशक्‍य असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेचे पडसाद मराठा मोर्च्यात उमटण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, मोर्चाच्या वातावरण निर्मितीसाठी रविवारी शहरात बाईक रॅली काढण्यात आली होती. धंतोलीच्या यशवंत स्टेडीयम पासून सुरू होणाऱ्या मोर्चात सर्व पक्षीय मराठा आमदार तसेच प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. 

विदर्भ

नागपूर - कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरे नेली जात असल्याच्या माहितीवरून सदर पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमुळे गड्डीगोदाम...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप  नागपूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - वडसा वनविभागातून बंदिस्त करून गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये सध्या मुक्कामी असलेल्या वाघिणीची मुक्तता करण्याचा समितीच्या...

रविवार, 20 ऑगस्ट 2017