दोन गटांत सशस्त्र संघर्ष, दहा गंभीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

उमरेड - मुली नांदत नसल्याच्या कारणाहून झालेल्या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाले. लाठ्या व तलवारींनी हल्ला चढविल्याने दहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्‍यातील उदासा गावात सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल केले आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी ३२ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश्‍वर मांडवकर यांच्या मुलीचे लग्न सुरेश तांबू यांच्याशी तर सुरेशच्या बहिणीचे लग्न मांडवकर कुटुंबातील रवी याच्याशी झाले होते. 

मात्र, दोघी एकमेकांच्या घरी नांदायला तयार नव्हत्या. बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला वाद पोलिसात पोहोचला. अनेकदा तक्रार झाल्यानंतरही समेट घटला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा वाद उफाळून आल्यामुळे दोन्ही कुटुंबांत मारहाण झाली. काठ्या व तलवारीने हल्ला झाला. यात दहा जण गंभीर जखमी झाले. 

एकूण ३२ जणांवर गुन्हे 
उमरेड पोलिसांना गणपती किसन तांबू याने दिलेल्या तक्रारीवरून १४ जणांवर तर राजेंद्र मोहनलाल मांडवकरच्या तक्रारीवरून १९ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. दोन्ही गटांतील ३२ आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

गंभीर जखमी नागपुरात
हल्ल्यात गंभीर जखमी व नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आलेल्यांमध्ये रोशन तांबू, रजीबाई, वसंतू, सुनील, मोहनलाल, सोनू, अनिल, वासंती या तांबू कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. अन्य जखमींना उमरेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: 10 injured in two group fighting crime