वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दहा लाख

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दहा लाख

अकोला : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना वनविभागातर्फे देण्यात येणाऱ्या आठ लाख रुपये अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करून आता दहा लाख रुपये देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांसाठीसुद्धा २५ एेवजी ४० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सोमवारी (ता.९) विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना वनमंत्र्यांनी वरील घोषणा केली. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना वनविभागातर्फे करण्यात येत असून, प्रामुख्याने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्या माध्यमातून यासंदर्भात उपाययोजना करण्यात येत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यातील वृक्ष आच्छादन वाढावे यासाठी तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. त्यानुसार यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम सुरू असून, ही मोहीम म्हणजे एक मिशन आहे. त्यामध्ये राजकारण न करता वसुंधरेप्रती असलेल्या कर्तव्याची जाण ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रोख मदत ३० टक्के
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतकांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या १० लाख रुपये अर्थसहाय्यापैकी केवळ ३० टक्के म्हणजे तीन लाख रुपये रक्कम रोख दिली जाणार आहे. उर्वरित सात लाख रुपये ठेवीच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी घोषणेत स्पष्ट केले.

यापूर्वी मिळायची केवळ १.८ टक्के रोख रक्कम
यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आठ लाख रुपये अर्थसहाय्य वनविभागाकडून दिली जायची. परंतु, त्यापैकी केवळ १.८ टक्के म्हणजे १५ हजार रुपये रक्कम रोख व उर्वरित सर्व रक्कम ठेविच्या स्वरुपात दिली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com