राज्यात २० हजार ३३० मेगावॉट विजेचा पुरवठा

Electricity
Electricity

नागपूर - महावितरणने शनिवारी (ता.१५) २० हजार ३३० मेगावॉट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. राज्याची ही आकडेवारी विक्रमी कमाल वीजमागणीच्या जवळपास  आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०१८ ला २० हजार ३४० मेगावॉट वीज मागणीची नोंद करण्यात आली होती. ही मागणी गत वर्षाच्या सप्टेंबर महिन्यातील कमाल मागणीच्या तुलनेत ३ हजार ५०० मेगावॉट म्हणजेच २२ टक्के जास्त आहे. द्विपक्षीय लघु निविदेद्वारे विजेची तूट भरून काढण्यात आली. 

कोळशाच्या तुटवड्यामुळे महावितरण कंपनीशी दीर्घकालीन वीज करार झालेल्या कंपन्यांकडून कमी वीजपुरवठा होत आहे. यानंतरही महावितरणने साधारणत: ५ हजार २०० मे. वॉ. इतक्‍या विजेच्या तफावतीपैकी २७५ मे.वॉ. वीज द्विपक्षीय लघु निविदेद्वारे व ३ हजार २०० मे.वॉ.  इंडियन एनर्जी एक्‍चेंजद्वारे वीज खरेदी करून उर्वरित १ हजार ६७५ मे.वॉ. कोयना जल विद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करून निर्माण झालेली विजेची तूट भरून काढली.

दीर्घकालीन वीज खरेदी करार असलेल्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून २९ हजार ८४० मेगावॉट क्षमतेपैकी साधारणपणे १४ हजार ३५४ मेगावॉट विजेची उपलब्धता होती. महानिर्मितीकडून एकूण १० हजार ८४२ मे.वॉ. क्षमतेपैकी ५ हजार ११६ मे.वॉ. तसेच एनटीपीसी कंपनीकडून एकूण करारीत ४ हजार ८६२ मे.वॉ. क्षमतेपैकी ३ हजार ५३६ मे.वॉ. व अणू वीज प्रकल्पाकडून (एनपीसीआयएल) एकूण करारीत ७५७ मे.वॉ. क्षमतेपैकी ४६१ मे.वॉ. इतक्‍या विजेची उपलब्धता झाली. अदानी पॉवरकडून एकूण करारीत ३ हजार ८५ मे.वॉ. क्षमतेपैकी २ हजार ३९४ मे.वॉ. व रतन इंडियाकडून करारीत क्षमतेएवढी म्हणजे १ हजार २०० मे.वॉ. वीज उपलब्ध झाली. या व्यतिरिक्त सीजीपीएलकडून ५८८ मे.वॉ., जेएसडब्ल्यूकडून २८० मे.वॉ. व एम्कोकडून ८७ मे.वॉ. एवढी वीज उपलब्ध झाली आहे.

शिवाय सौरऊर्जेतून १ हजार ४२ मे.वॉ. पैकी ६२८ मे.वॉ. इतकी वीज मिळाली. पवन ऊर्जेवर आधारित प्रकल्पांमधून ३ हजार ७६५ मे.वॉ. इतक्‍या क्षमतेपैकी फक्त ११५ मे.वॉ. वीजच उपलब्ध झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com