यवतमाळ - वीज पडून तीन मेंढपाळ गंभीर जखमी

सदाशिव नरोटे
गुरुवार, 7 जून 2018

नेर (यवतमाळ) : तालुक्यातील ब्रम्ही येथील शिवारात झाडाखाली बसलेल्या मेंढपाळांवर वीज कोसळून तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.6) रात्री नऊच्या सुमारास झाली. जखमींना येथे प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.

बंडू रामू नेमाले, बालू ज्योतीराज टिले व सुभाष बालू टिले असे वीज कोसळून जखमी झालेल्यांची नावे आहेत. चौथ्या जखमीचे नाव अद्याप समजू शकले नाही.

नेर तालुक्यातील दगडधानोरा भागात धनगर बांधवांनी आपल्या मेंढ्या बसवल्या होत्या. एका झाडाखाली चौघे बसून होते. मेंढ्यांचे ठाण बाजूलाच होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास वादळवार्‍यासह पाऊस सुरू झाला, त्यातच वीज झाडावर कोसळून त्याखाली बसलेले चौघेही जखमी झाले. त्यापैकी एकाला कमी धक्का बसला. परंतु, बंडू रामू नेमाले, बालू ज्योतीराज टिले व सुभाष बालू टिले हे तिघे गंभीर जखमी झाले.

काही समाजबांधवांनी जखमींना नेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच नेर येथील समाजबांधव रुग्णालयात मदतीला धावून गेले. नेर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार करून तिन्ही जखमींना तातडीने यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केले. याबाबतची माहिती मिळताच यवतमाळ येथील उत्तम सुरनर, दीपक पुनसे, रवी मुंदाने, गुलाब हाके, रोडबाजी नेमाने, नीलकंठ महानूर, वामन हाके, तुळशिराम टेळे, बंडूजी नेमाने, नथूजी आदी समाजबांधवांनी भरपावसात येऊन मदतकार्य केले. डॉक्टरांनीही रात्रभर शर्थीचे प्रयत्न केले व त्यांचे प्राण वाचले.

दरम्यान, या जखमींना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी धनगर समाजाचे अविनाश जानकर, दीपक पुनसे, उत्तम सूरनर आदींनी केली आहे.

Web Title: 3 shepherd injured for lightning in yawatmal