राष्ट्रीय लोकअदालतीत 18 प्रकरणांचा निपटारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नागपूर : सेमिनरी हिल्स येथील ऋण वसुली प्राधिकरण येथे बार असोसिएशनच्या सहकार्याने 11 वी राष्ट्रीय लोकअदालत नुकतीच पार पडली. यात 18 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

नागपूर : सेमिनरी हिल्स येथील ऋण वसुली प्राधिकरण येथे बार असोसिएशनच्या सहकार्याने 11 वी राष्ट्रीय लोकअदालत नुकतीच पार पडली. यात 18 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

उद्‌घाटन व्यवस्थापक एस. एल. मोघे यांच्या हस्ते झाले. कोषाध्यक्ष राजेश ठक्कर, कार्यकारिणी सदस्य पंकज दीक्षित, राजेश ठक्कर उपस्थित होते. राष्ट्रीय लोकअदालत हा एक चांगला मंच असून दोन्ही पक्षकार आपसांत लवकरात लवकर निपटारा करू शकतात. पक्षकार आणि बॅंकांनी या राष्ट्रीय लोकअदालतींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या अदालतीत दोन पीठांची व्यवस्था करण्यात आली होती. ई. एन. काझी आणि के. बी. झिंझर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व अधिवक्‍ता पंकज गुप्ता, श्‍याम धनराजानी, स्टील हार्डवेअर चेंबरचे अध्यक्ष राजेश लखोटिया, एमआयएचे कार्यकारी सदस्य गणेश जायस्वाल यांच्या उपस्थितीत कर्जवसुली प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

या अदालतीत एकूण 159 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने 18 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच 41 कोटी 91 लाख रुपयांची कर्जवसुली करण्यात आली. ऍड. एच. एम. चांदूरकर, पी. व्ही. कुलकर्णी, एस. डी. इंगोले, एम. वाय. वडोदकर, आर. एच. चांदूरकर, व्ही. नरसापूरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी कर्जवसुली प्राधिकरणाचे वसुली अधिकारी एस. आर. परांजपे, अनुभव सक्‍सेना यांनी परिश्रम घेतले.