३५ गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

सालेकसा -  नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता लटोरी व बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली. परंतु, ही योजना कुचकामी ठरली आहे. तालुक्‍यातील ३५ गावांत आजही पाणीटंचाई आहे. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.    

लटोरी व बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे देवरी विधानसभा क्षेत्रातील आमगाव, सालेकसा तालुक्‍यातील ३५ गावांत पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने १० वर्षांपूर्वी सुमारे २८ कोटी रुपये खर्चून नळ योजना उभारली. तेलीटोलावरून ही पाइपलाइन टाकण्यात आली. पाणीपुरवठा पुजारीटोला धरण येथून होतो. मात्र, आजही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे तालुक्‍यातील ३५ गावांतील नागरिकांना  पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत आहे. 

काहींना १०० ते २०० रुपये पाण्यासाठी मोजावे लागत आहेत. तालुक्‍यात एकूण बोरवेल ११०४ असून यात २० ते २५ बोअरवेल बंद पडून आहेत. सोनारटोला, दानीटोला, जांभळी, धनसुवा, निंबा, कहाली, वारकरीटोला, दुर्गुटोला, मक्‍काटोला, इसनाटोला, गोंडीटोला, लटोरी, खडखडीटोला, नानव्हा, सुरजाटोला, नवाटोला, कोसमतर्रा अशा अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. संबंधित विभागाने पाणीटंचाईवर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.