42 नगरसेवक महापालिकेत परतले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नागपूर - स्थायी समितीच्या आजी-अध्यक्षांचा अपवाद वगळता भाजपचे बहुतांश नगरसेवक पुन्हा महापालिकेत परतलेत. दुसरीकडे कॉंग्रेसचे काही मोजके नगरसेवक वगळता इतरांना घरी बसावे लागले. यात सर्वाधिक 27 नगरसेवक भाजपचे आहेत, तर कॉंग्रेसच्या नऊ नगरसेवकांचा समावेश आहे. 

नागपूर - स्थायी समितीच्या आजी-अध्यक्षांचा अपवाद वगळता भाजपचे बहुतांश नगरसेवक पुन्हा महापालिकेत परतलेत. दुसरीकडे कॉंग्रेसचे काही मोजके नगरसेवक वगळता इतरांना घरी बसावे लागले. यात सर्वाधिक 27 नगरसेवक भाजपचे आहेत, तर कॉंग्रेसच्या नऊ नगरसेवकांचा समावेश आहे. 

भाजपचे 63 नगरसेवक होते. यापैकी काहींना उमेदवारी देण्यात आली नव्हती. यंदा भाजपला भरभरून यश मिळाले असून, नगरसेवकांची संख्या तब्बल 108 इतकी झाली आहे. यावरून नव्या नगरसेवकांची संख्या वाढली असल्याचे स्पष्ट होते. काही माजी नगरसेवकही पुन्हा महापालिकेत परतले आहेत. भाजपची उमेदवारी वाटप करताना जुन्या आणि नव्यांचा समन्वय ठेवला होता. अडचणीच्याच ठिकाणी काही नगरसेवकांना उमेदवारी दिली नाही. कॉंग्रसने मात्र अनेक नगरसेवकांना उमेदवारीच दिली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. पाडापाडीचे राजकारण झाले. यामुळे चाळीसवरून कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या अठरावर आली. यातही कॉंग्रेसचे दिग्गज म्हणून ओळखले जाणारे शहराध्यक्ष विकास ठाकरे पराभूत झाले. त्यांच्यासोबत प्रशांत धवड, प्रसन्न बोरकर, गुड्डू तिवारी, रेखा बाराहाते, दीपक कापसे, अरुण डवरे पराभूत झालेत. यापैकी कापसे व डवरे यांना उमेदवारीच देण्यात आली नव्हती. 

भाजपचे नगरसेवक सुषमा चौधरी, गोपीचंद कुमरे, भाग्यश्री कानतोडे, वर्षा ठाकरे, प्रगती पाटील, भूषण शिंगणे, संगीता गिऱ्हे, संदीप जाधव, प्रवीण भिसीकर, माया इवनाते, संदीप जोशी, लक्ष्मी यादव, प्रवीण दटके, संजय बालपांडे, विद्या कन्हेरे, दयाशंकर तिवारी, यशश्री नंदनवार, रमेश पुणेकर, बाल्या बोरकर, चेतना टांक, मनीषा कोठे, स्वाती आखतकर, रिता मुळे, सतीश होले, रवींद्र भोयर, अविनाश ठाकरे, कोठे, दिव्या धुरडे यांचा समावेश आहे. कॉंग्रेसचे संदीप सहारे, भावना लोणारे, हर्षलता साबळे, पुरुषोत्तम हजारे, संजय महाकाळकर, उज्ज्वला बनकर, प्रफुल्ल गुडधे, तानजी वनवे आणि मनोज सांगोळे यांच्या पत्नी नगरसेविका होत्या. या वेळी तानाजी व मनोज निवडून आले आहेत तर प्रशांत चोपरा यांच्याऐवजी कॉंग्रेसने गार्गी चोपरा यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीचे दुनेश्‍वर पेठे, शिवसेनेचे किशोर कुमेरिया, मंगला गवरे आणि कॉंग्रेसच्या आणि आता अपक्ष लढलेल्या आभा पांडे पुन्हा निवडून आले आहेत. 

बसपचा एकही नगरसेवक परतला नाही 
मागील निवडणुकीत बसपचे एकूण बारा नगरसेवक निवडून आले होते. यापैकी एकही नगरसेवक महापालिकेत परतला नाही. विद्यमान नगरसेवकांपैकी बहुतांश जणांना बसपने उमेदवारीच दिली नव्हती. यावेळी 10 उमेदवार बसपचे निवडून आले आहेत. ते सर्व प्रथमच महापालिकेत येणार आहेत.

Web Title: 42 corporator returned to the Municipal Corporation