अस्वलाच्या हल्ल्यात पाच ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

चंद्रपूर - तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या मजुरांवर पिसाळलेल्या अस्वलाने हल्ला करून पाच जणांना ठार केले. यात एक गंभीर जखमीही झाला. ही घटना शनिवारी (ता. 13) सकाळी 8 वाजताच्या सुमारास खरकाडा जंगलात घडली.

मृतांमध्ये रंजना अंबादास राऊत (रा. किटाळी), कुणाल दुधाराम राऊत (रा. किटाळी), मीना दुधराम राऊत (रा. किटाळी), बिसन सोमा कुळमेथे (रा. किटाळी) आणि फारूख युसूम शेख (रा. जगनाळा) यांचा समावेश आहे.

सचिन बिसेन कुळमेथे हा गंभीर जखमी असून, त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या अस्वलाने वनविभागाच्या शॉर्पशूटरने ठार केले.