accident
accident

बँड पार्टीवर काळाचा घाला; पाच जण ठार 

वाशिम : सिंदखेडराजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पार्टीवर काळाने घाला घातला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील बँड पार्टीच्या वाहनास भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. लोणार तालुक्यातील ब्राह्मण चिकना गावाजवळ नागपुर मुंबई महामार्गावर रात्री तीन सुमारास ही घटना घडली. या अपघातात 8 जण गंभार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीबी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा येथे गणपती विसर्जनासाठी बॅंड पार्टी जात होती. वाशिम जिल्ह्यातील भरजहागीर येथील पिकअपमध्ये दहा ते बारा जण जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. लोणार तालुक्यातील ब्राह्मण चिकना गावाजवळ लक्झरी बस व पिकअपमध्ये व जोरदार धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व जण वाशिम जिल्ह्यातील भरजहागीर येथील रहिवासी आहेत. या अपघातात अरूण संजय कांबळे (वय 22), राजु भगवान कांबळे (वय 25), ज्ञानेश्वर वामन डोंगरे (वय 20) यांच्यासह आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com