गावकऱ्यांना शस्त्रक्रिया, उपचारासाठी 5 लाखांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नागपूर - राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानासाठी राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत 30 एप्रिल आयुषमान भारत दिवस म्हणून संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे. आयुष्यमान भारत दिवसानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असून, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणातील लाभार्थ्यांची माहिती ग्रामसभेला देण्यात येईल. या योजनेअंतर्गत कुटुंबांना वार्षिक 5 लाखांपर्यंत मान्यता प्राप्त रुग्णालयातून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. 

आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली. यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी 30 एप्रिल रोजी ग्रामसभेत याद्यांचे वाचन करावे, अशी सूचना केली. 

या योजनेत ग्रामीण लाभार्थ्यांची पडताळणी व अतिरक्त माहिती संकलन मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त माहिती संकलित करताना लाभार्थ्यांच्या मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक तसेच कुटुंबांच्या सद्य:स्थितीतील बदलांची माहिती घ्यावयाची आहे. त्यानुसार 30 एप्रिल रोजी ग्रामसभेत याद्यांचे वाचन करण्यात येईल. त्यासाठी तालुकास्तरावर ग्रामसवेक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, तसेच आशा यांची पथके तयार करण्यात आली आहे. 

आयुषमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्याच्या 13 तालुक्‍यातील 1891 गावातील सुमारे 1 लाख 76 हजार 903 कुटुंबांना 5 लक्ष रुपयापर्यंतच्या मान्यताप्राप्त अंगीकृत रुग्णालयातून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. 

ग्रामसभेत येताना मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका सोबत आणावी. तसेच आपल्या कुटुंबांची नोंदणी करून प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मुद्‌गल यांनी केले. 

Web Title: 5 lakhs help for the treatment of the villagers

टॅग्स