ट्रक-रिक्षा अपघातात साठ वर्षीय महिला जागीच ठार 

accident
accident

अकोला : भरधाव ट्रक समोरील अॅप रिक्षांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात अॅपेतील साठ वर्षीय महिला जागीच ठार तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना वाडेगांव-बाळापूर मार्गावर आज सकाळी घडली.

आज सोमवारी बाळापूर पोलीसांच्या हद्दीत सकाळी हिंगणा फाट्यावर घडली. 
एम एच 30 एए 619 हा अॅपे रिक्षा वाडेगाव येथून प्रवाशी घेऊन बाळापूरकडे येत असताना पातूर कडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करताना अॅपेला जोरदार धडक दिली. त्यामुळे अपघात होऊन निर्गूणा रामकृष्ण सुरवाडे (वय 60, रा. भंडार ता. पातूर) ही महीला जागीच ठार झाली. व अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सदर ट्रक मार्गाच्या कडेला उलटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com