मेडिकलला अवघे नऊ कोटी

Nagpur-Medical-College
Nagpur-Medical-College

नागपूर - राजधानी मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटल १३५२ खाटांचे आहे. वर्षाला सहा लाख रुग्णांची नोंद होते. तर मध्य भारतातील सर्वांत मोठे रुग्णालय अशी ओळख असलेले मेडिकल रुग्णालय १,७०० खाटांचे असून, येथे वर्षाला सात लाखांवर रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात. परंतु, अनुदान देताना शासनाकडून पक्षपाती धोरण स्वीकारले जाते. जे. जे. हॉस्पिटलला वर्षाला २१ कोटींचे अनुदान दिले जाते. मेडिकलची बोळवण अवघ्या ९ कोटींवर होते.

तोकड्या अनुदानाअभावी गरीब, बीपीएल रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. गेल्या पाच वर्षांपासून ‘व्हाइट बूक’मधून असा काळा प्रकार होत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले.

मेडिकल सध्या १,७०० खाटांवर पोहोचले आहे. विदर्भासोबतच छत्तीसगड, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशातील ३० टक्के रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते. तर एक हजार रुग्ण भरती असतात. किरकोळ तीन आणि सात मुख्य शस्त्रक्रियागार आहेत. याशिवाय शैक्षणिक संस्था असल्याने येथील उपचाराचा दर्जा उंचावला आहे. संसर्गरोग असलेल्या चिकनगुन्या,  डेंगीपासून तर स्वाइन फ्लूसारखे घातक रुग्ण योग्य तऱ्हेने हाताळले जातात. परंतु, अनुदान कमी असल्याने औषधांचा नेहमीच तुटवडा असतो. 

अधिष्ठात्यांना दररोज लोकल पर्चेसचे अधिकार केवळ एक हजार रुपयाचे आहेत. असे विदारक चित्र रुग्णसेवेचे आहे. दरवर्षी व्हाइट बुकममधून मेडिकल, मेयोला अनुदान देताना अन्याय केला असल्याचे पुढे आले. सर जे. जे. समूह रुग्णालय केवळ १,३५२ खाटांचे असताना २१ कोटींचे अनुदान या रुग्णालयाने लाटले. तर जे. जे. रुग्णालयापेक्षा ४०० जास्त खाटा असूनही मेडिकलच्या तिजोरीत ९ कोटींचे अनुदान जाते. २०१३-१४ या वर्षात व्हाईट बुकमधील नोंदीनुसार २१ कोटींचे अनुदान जे.जे.ला मिळाले. तर मेडिकलला अवघे ९ कोटी देऊन बोळवण केल्याचे दिसून येते. हेच चित्र २०१६-१७ मध्येही असल्याची नोंद व्हाइट बुकमध्ये आहे.

अनुदान वितरणातील तफावत 
मेडिकल        १७०० खाटा       ९ कोटींचे अनुदान
सर जे. जे.       १३५२ खाटा        २१ कोटींचे अनुदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com