ठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स

93 lakh advances in the city council Mehran Bhumipujan on contractor
93 lakh advances in the city council Mehran Bhumipujan on contractor

आर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर मागील चार दिवसा पुर्वी शुक्रवार दि १५ ला या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष सर्व सभापती नगर सेवक व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. सिद्धीविनायक ट्रेडर्स चाळीसगाव या कंपनीने हे काम घेतलेले आहे. विषेश बाब म्हणजे ज्या दिवशी या कामाचे भूमिपूजन झाले त्याच दिवशी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी या एजन्सीला थोडे थोडके नव्हे तर चक्क ९३ लाख रुपयाचे बिल काढुन दिले आहे.

या कामाची सुरुवात दोन दिवसापासून सुरु झाली असून काम सुरू करण्यापुर्वीच पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारावर नगर परिषद एवढी मेहरबान कशी? असा प्रश्न  सामान्य नागरीकांना पडला आहे. ज्या दिवशी भुमिपुजन झाले त्या दिवशी सिद्धीविनायक ट्रेडर्स चे संचालक आर्णीत होते. भुमिपुजन होताच त्याच दिवशी ९३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आल्याची कानोकान खबर कुणालाही नव्हती. पुण्यनगरी जवळ या बाबतची माहिती मिळताच सर्वजन चक्रावून गेले. नगर परिषद मधील सभापती विरोध पक्षनेता नगर सेवक यांनाही ९३ लाख रुपयाचे अ‍ॅडव्हान्स बिल दिल्याचे माहिती पासुन अनभिज्ञ दिसले.

काम सुरू न होताच केवळ पाईप आणले म्हणून एवढी मोठी रक्कम ठेकेदाराला दिल्याने नगर परिषद मधील पदाधिकारी व नगर सेवक अवाक झाले. पाणीपुरवठा सभापती लक्ष्मण पठाडे यांना या बाबत छेडले असता अ‍ॅडव्हान्स बिल देण्यात आल्याचे माहीती पासुन आपण अनभिज्ञ असल्याचा देखावा त्यांनी केला. पाणी पुरवठा विभागात या बाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता प्रत्येक कर्मचारी एका मेकावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. या विभागातील लेखा अधिकारी बोरकर ज्यांनी हा ९३ लाख रुपयाचा धनादेश तयार केला ते दोन दिवसा पासुन सुट्टीवर गेलेले आहेत. त्यांना दुरध्वनी वरुन संपर्क करुन या धनादेशा बाबत छेडले असता त्यांनी उलट प्रती प्रश्न करीत चेक दिला असे म्हणुन आश्चर्य व्यक्त केले. प्रत्येक जन लपवा छपवी करतांना दिसत होते.

नगर परिषद ची आमणी येथुन आर्णी शहराला  पाणी पुरवठा  करणारी मोठी विहीर आहे. ग्राम पंचायत असतांना १९८९-९० मध्ये या विहीरीचे खोदकाम करण्यात आले होते.  तेव्हा पासुनची असलेली पाईपलाईन अनेक ठिकाणी जिर्ण झाली. १४ वित्त आयोगाच्या  निधीतुन हे काम मंजूर करण्यात आले.  आमणी ते शहरातील पाण्याचे टाकी पर्यंत ५ किलोमीटर पि आय के १ पाईप व ५० हार्स पावरची मोटर अशे १ कोटी ४१ लाख रुपयाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. दाभडी रोड वरुन आमणी रस्त्यावर जाणार्‍या कॅनल ने हे पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. उन्हाळ्यात हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. 

परंतु ते होऊ शकले नाही. पावसाळ्याचे तोंडावर या कामाची सुरुवात होत आहे. पुठे शेतातून हे पाईपलाईन जात असल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केल्याने हि योजना सध्या तरी पुर्णत्वास जाणे नाही. काम पुर्ण होणे नसतांना सुद्धा मुख्याधिकारी ९३ यांनी लाख रुपयांचा धनादेश देणे कितपत योग्य आहे. यावर अनेक जन प्रश्न उपस्थित करीत आहेत. नुकतच मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगर सेवकांना चार पाणी  कायद्याचे भाषेत इशारा पञ देउन नगर परिषद वर एकहाती अंकुश मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. याचाच भाग म्हणुन कुणालाही माहिती न होऊ देता पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारावर मेहरबानी  दाखवण्यात आलेली आहे. केवळ पाईप आणले असल्याने अ‍ॅडव्हान्स देण्यात येत असेल तर ईतर काम करणाऱ्या ठेकेदारांना मटेरियल कामावर टाकल्यावर काम न करता अ‍ॅडव्हान्स देणार का? असा प्रश्न ठेकेदार व्यक्त करित आहेत. 

एकी कडे शासन दरबारी पारदर्शक कामकाजावर भर दिला जात असतांना मात्र आर्णी नगर परिषद मध्ये पारदर्शक तत्व गुंडाळून ठेवण्यात आले आहे. खुद्द नगर सेवकांना माहीती मागण्याचा अधीकारच नसल्याच मुख्याधिकारी यांनी पञातुन अध्यक्षा सह सर्व नगर सेवकांना कळवल आहे. ९३ लाख रुपयाचा अ‍ॅडव्हान्स दिल्या बाबत नगराध्यक्ष यांचे मत जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना याची आधीच कल्पना आल्याने त्यांनी फोन घेण्याचे सतत टाळले. 


हो... ९३ लाख रुपये देण्यात आले
शाखा अभियंता

 आमणी वरुन पाईपलाईन चे काम करणार्‍या सिद्धीविनायक ट्रेडर्स यांना ९३ लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला आहे. पाईप आणले असल्याने त्यांना अ‍ॅडव्हान्स देण्यात आला आहे. अशी माहिती प्रभारी शाखा अभियंता गौरव मंडळे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com