शम्मी कपूर यांचे सुपुत्र बाइकने नागपुरात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नागपूर - शम्मी कपूर व गीता बाली यांचे सुपुत्र आदित्यराज कपूर बाइकने नागपुरात दाखल झाले असून, आतापर्यंत १५ देशांमध्ये त्यांनी अशी भ्रमंती केली आहे. रोटरी क्‍लब ऑफ नागपूरच्या वतीने चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात आदित्यराज यांनी भटकंतीच्या कथा सांगितल्या आणि नागपुरातील आठवणींनाही उजाळा दिला.

सहायक दिग्दर्शक, नट, व्यावसायिक या सर्व पातळ्यांवर काम करून चुकलेले आदित्यराज सध्या पूर्णवेळ ‘बाइकरायडर’ आहेत. अलीकडेच स्वतःचा ६१वा वाढदिवसदेखील त्यांनी रशियात रायडिंग करतानाच साजरा केला, हे विशेष. जगभर मोटारसायकलने भ्रमंती करायची, असे मनात आले आणि बायको व मुलाला माझी कल्पना सांगितली. मुलगासुद्धा बाइक रेसर आहे. त्यानेही मला प्रोत्साहन दिले. परंतु, यापुढे मी काम करणार नाही, असे सांगितल्यावर मुलाचे टेंशन मात्र वाढले होते. या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा तीन वेगवेगळ्या प्रसंगांना मी बाइकनेच नागपुरात येऊन गेलो आहे, असे आदित्यराज म्हणाले.
जर्मनी असो वा रशिया, देश कितीही मोठा असो, भटकंती करताना कधीही मोठ्या शहरांमध्ये आणि मोठमोठाल्या हॉटेल्समध्ये थांबलो नाही. कायम छोट्या गावांमध्ये थांबतो. त्यामुळे लोकांशी संवाद होतो. त्यांचा देश समजून घेता येतो आणि आपल्या देशाची समृद्धीही त्यांच्यापर्यंत पोहोचविता येते, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

नागपुरात बालपण
माझी आत्या नागपूरला राहायची. त्यामुळे दहा-पंधरा वर्षांचा होईपर्यंत खूपवेळा मी नागपूरला आलो. माझे चुलतभावंडं इथे असल्यामुळे त्यांच्यासोबत नागपूरला खूप फिरलो आहे. इथल्या संत्र्यांची चव मी विसरलेलो नाही, अशी आठवण आदित्यराज कपूर यांनी सांगितली.

Web Title: aadityaraj kapoor in nagpur bike