हिंदूंच्या सुरक्षेसाठी ‘ॲक्‍शन प्लॅन’ - प्रवीण तोगडिया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नागपूर - हिंदूंवर होणारे विविध हल्ले पाहता त्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार असल्याची माहिती गुरुवारी (ता. २९) विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिली.

नागपूर - हिंदूंवर होणारे विविध हल्ले पाहता त्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार असल्याची माहिती गुरुवारी (ता. २९) विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिली.

विश्‍व हिंदू परिषद, केंद्रीय व्यवस्थापन समिती आणि प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनाच्या उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी प्रवीण तोगडिया बोलत होते. व्यासपीठावर गोविंदगिरी महाराज, देवनाथ पीठाचे जितेंद्रनाथ महाराज, सुभरेंद्र महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी, राष्ट्रीय महामंत्री चंपतराय, विदेश विभागाचे कार्याध्यक्ष अशोक चौगुले, प्रांताध्यक्ष विजय वालिया आदी उपस्थित होते. आज हिंदू ना शहरात सुरक्षित आहे ना ग्रामीण भागात. त्यांच्यावर सांस्कृतिक आक्रमणांचा भडीमार होत आहे. त्याची ओळख पुसली जाणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर हिंदूंसाठी ‘ॲक्‍शन प्लॅन’ कार्यरत राहणार आहे. याचे प्राथमिक स्वरूप तयार झाले असून, अधिवेशनामध्ये होणाऱ्या चर्चेतून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. राममंदिराच्या विषयावर बोलताना तोगडिया यांनी गरज पडल्यास जनआंदोलन करण्यात येण्याचा इशारा दिला. तसेच मंदिर त्याच जागेवर संसदेमध्ये कायदा निर्माण करून बनेल आणि ते रामजन्मभूमी न्यास साकारेल, असे तोगडिया म्हणाले.  

यापुढे अयोध्येमध्ये एकही मशीद उभारू देणार नसल्याचे सांगत बाबरच्या नावाने असलेल्या विविध वास्तू, मार्ग नष्ट व्हायला हव्यात, असे ते म्हणाले.

हे कसले अच्छे दिन?
गोविंदगिरी महाराज यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंपचे कार्य एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचे सांगत यामुळे संत समुदायामध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची तक्रार व्यक्त केली. जे कार्य विहिंपचा कार्यकर्ता करतो तेच कार्य संघाचा धर्मजागरण विभाग करत आहे. संघ संघटनेसाठी असून विहिंप ही धार्मिक कार्ये, हिंदूंचे संरक्षण यांना समर्पित असलेले संघटन असल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत महाराजांनी ‘अच्छे दिन’ आले; परंतु त्याची अनुभूती होत नसल्याचे टीकास्त्र सोडले. आम्हाला ‘बहुत अच्छे दिन’ची प्रतीक्षा असल्याचे म्हणत मोदी सरकारला घरचा अहेर दिला.

Web Title: action plan for hindu security