अभिनेता अमीर खानने राणवाडीत केले श्रमदान

अभिनेता अमीर खानने राणवाडीत केले श्रमदान
अभिनेता अमीर खानने राणवाडीत केले श्रमदान

पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा
वर्धा: पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्‍यातील राणवाडी या गावात आज (मंगळवार) चित्रपट अभिनेता अमीर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी श्रमदान केले.

येथील दृष्टीहीन असलेला बंडू धुर्वे याने गावातील नागरिकांना प्रोत्साहित करून पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला सुरुवात केली. याची दखल घेत अमीर खान पत्नीसह सकाळी नऊ वाजता गावात पोचला. यावेळी त्यांच्यासोबत अंध असलेल्या पाणी फाउंडेशनच्या युवकांनीही श्रमदान केले. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, तहसीलदार श्री. कुमावत, गटविकास अधिकारी उमेश नंदगवळी, पाणी फांऊडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आर्वी तालुक्‍यातील 45, कारंजा 90, सेलू 45, देवळी व वर्धा येथील गावे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेत सहभागी गावात लोकसहभागातून तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, दगडीबांध, बांधबंदिस्ती, शोषखड्डे, रोपवाटिका, आगपेटिमुक्त शिवार यासारखी कामे करण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांचा व सामाजिक संस्थेचा मोठा सहभाग मिळत आहे. यावेळी अमीर खान यांनी पाणी फांउंडेशने दिव्यांग कार्यकर्ते बंडू धुर्वे यांच्यासोबत संवाद साधला. तसेच दिव्यांगासोबत क्रिकेट सामन्याचा आनंदही अमीर खानने घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com