लाचखोर कृषीविकास अधिकाऱ्याला अटक  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

वाशीम - जिल्हा परिषद कृषी विभागाला एचडीपीई पाइप पुरवठा करणाऱ्या कंपनीचे थकीत बील काढण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी विकास अधिकाऱ्याविरुद्ध शुक्रवारी(ता.१०) गुन्हा दाखल करण्यात अाला. अाबा गेनबा धापते (वय ५०, साईप्रसाद अपार्टमेंट, कळमकर वस्ती, बाणेर, पुणे) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव अाहे. 

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार नाशीक जिल्ह्यातील मालेगाव येथील पाइप उत्पादक कंपनीने जिल्हा परिषद कृषी विभागाला एचडीपीई पाइपचा मार्च २०१६ मध्ये  पुरवठा केला होता. त्याचे १७ लाख रुपये बील बाकी होते. ते बील काढून देण्यासाठी कृषीविकास अधिकारी अाबा धापते याने १९ टक्के प्रमाणे तीन लाख २० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे दाखल झाली होती. या तक्रारीची खातरजमा केली असता धापते याने बील काढण्यासाठी १६ टक्क्याप्रमाणे दोन लाख ७४ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी रक्कम स्वीकारण्याबाबत धापते याला संशय अाल्याने त्याने रक्कम ती नाही. मात्र लाच मागितल्याचे मान्य केले. त्यावरून अटक करण्यात अाली. धापतेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे वाशीम येथील पोलिस निरीक्षक एन. बी. बोऱ्हाडे यांनी कारवाई केली.