शिवसेनेने पाठिंबा काढल्यास शेतकऱ्यांना न्याय - अजित पवार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

ठाकरे यांच्या आरोपात चूक काय? 
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ""गुंड, तडीपार, लॅंडमाफिया, खंडणीखोरांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. मंत्री त्याचे समर्थन करतात. "राज्याचे मुख्यमंत्री हे गुंडांचे मुख्यमंत्री आहेत,' या उद्धव ठाकरे यांच्या आरोपात चूक ती काय?''

अकोले - उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे भाजप सरकार महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कर्ज माफ का करीत नाही, हे नादान व शेतकरीविरोधी सरकार घालविण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावाच. त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी तालुक्‍यातील गणोरे येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर पिचड होते. 

केंद्र व राज्य सरकार केवळ थापा मारण्याचे काम करीत आहे, अशी टीका करून पवार म्हणाले, ""नवीन प्रकल्पांना मंजुरी द्यायची नाही आणि जुन्या कामांना निधी द्यायचा नाही, अशी यांची पद्धत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणाऱ्या या सरकारचा शिवसेना पाठिंबा का काढून घेत नाही? नोटाबंदीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. कमी गाळपामुळे साखरेचे भाव वाढतील, पर्यायाने शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळण्याची शक्‍यता यंदा असतानाच आता परदेशातून कच्ची साखर आणण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे.'' 

पाण्याचे नियोजन पूर्णतः चुकले असून, रब्बी हंगामासाठी पाणी नाही. कारण नसताना भारनियमन केले जाते. दिवसाऐवजी रात्री वीजपुरवठा होतो. सहकारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी समृद्ध झाला; पण आता सहकाराला सुरुंग लावण्याचे काम केले जात आहे. चुकीच्या लोकांना जरूर शिक्षा करा; पण संपूर्ण क्षेत्रच बदनाम समजून ते मोडीत काढणे योग्य नाही, असेही पवार म्हणाले. 

ठाकरे यांच्या आरोपात चूक काय? 
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ""गुंड, तडीपार, लॅंडमाफिया, खंडणीखोरांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. मंत्री त्याचे समर्थन करतात. "राज्याचे मुख्यमंत्री हे गुंडांचे मुख्यमंत्री आहेत,' या उद्धव ठाकरे यांच्या आरोपात चूक ती काय?''

विदर्भ

अकाेला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने शुक्रवारी (ता. १८) महापाैर विजय अग्रवाल यांच्यासह भाजप...

02.30 PM

नागपूर - धरमपेठेतील वाहनांच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आज गुरुवारपासून ‘नो पार्किंग झोन’ अस्तित्वात आला. आज वाहतूक पोलिसांनी...

02.24 PM

३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश - ७३ हजार जागा रिक्त  नागपूर - ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेली राज्यातील जवळपास...

02.24 PM