करणीच्या कारणावरून बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू; तिघांवर गुन्हा दाखल
आखाडा बाळापूर - भुरक्‍याची वाडी येथे एका वृद्धास "तू करणी व भानामती करतोस', असे म्हणून तिघांनी बेदम मारहाण करून जखमी केले.

उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू; तिघांवर गुन्हा दाखल
आखाडा बाळापूर - भुरक्‍याची वाडी येथे एका वृद्धास "तू करणी व भानामती करतोस', असे म्हणून तिघांनी बेदम मारहाण करून जखमी केले.

उपचारानंतर वृद्धाचा मृत्यू झाला. याबाबत बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भुरक्‍याची वाडी येथे गेल्या रविवारी आत्माराम पागोजी आम्ले यांना गावातील दिनू शेळके, बसाजी शेळके, केशव बसाजी शेळके यांनी संगनमत करून शिवीगाळ केली. "तू करणी-धरणी का करतोस,' या कारणावरून लाकडी दांड्याने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यात आत्माराम पागोजी आम्ले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा साहेबराव आत्माराम आम्ले यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिनू शेळके, बसाजी शेळके, केशव बसाजी शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.