फुलांच्या व्यवसायातून गुंफा ‘पैशाची’ माळ 

Akola Agricultural University has started gardener training course
Akola Agricultural University has started gardener training course

अकोला - ‘तुम्ही दहावी उत्तीर्ण नाही, भांडवलाची अडचण, स्वतःची जागा नाही, नोकरी मिळणे अशक्य’, आता करायचे तरी काय? घाबरू नका; फुलांच्या माळा गुंफुनही तुम्ही मोठे व्यावसायिक होऊ शकता. विश्वास बसत नाही ना! होय, कृषी विद्यापाठात केवळ नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू असून, प्रशिक्षणार्थींना अल्प भांडवलात स्वतःचा व्यवसाय थाटता येतो, शिवाय नोकरीचीही संधी आहे. 

कौटुंबिक, आर्थिक अडचणीमुळे अनेकांना दहावी किंवा त्यापुढचे शिक्षण घेणे शक्य होत नाही. शिवाय उच्च शिक्षितांनाही सध्या बेरोजगारीचे प्रचंड चटके बसत आहेत. अशात दहावी उत्तीर्ण नसलेल्यांनी अर्थाजर्न करायचे कसे? ही व्यापक समस्या आहे. मात्र, अशांनाही स्वावलंबीपणे जगता यावे यासाठी, कृषी विद्यापीठाचा ‘माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम’ उत्तम संधी ठरत आहे. 

बारमाही व्यवसाय -
वर्षभर फुले व फुलांच्या सजावटीची मागणी असते. रोपवाटीका, बगिचे यांचे कामसुद्धा बारमाही असते. त्यामुळे माळी प्रशिक्षण घेतल्यानंतर बाराही महिने अर्थार्जनाचा मार्ग उपलब्ध असतो. 

माळी प्रशिक्षणातून या संधी -
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कमी भांडवलात फुलझाडांची, फळझाडांची रोपे, कलमे, बोनसाय, कॅक्टाय, लॉन, गवत थोड्या जागेत वाढवून विकण्याचा व्यवसाय करता येतो. हार, माळा, पुष्पगुच्छ विकता येतात. खासगी संस्थांमध्ये, रोपवाटीकेत पार्टटाईम नोकरी, ठेकेदारी पद्धतीने बगीचे तयार करून देणे, बंगल्यातील, कारखाण्यातील बगिच्यांची निगा राखणे, कुड्यांची लायब्ररी तयार करणे, हिरवळ तयार करून देणे, विविवाह समारंभ, वाढदिवसाला फुलांची सजावट आदी उपक्रमातून मिळकत प्राप्त करता येते. शेतकऱ्यांच्या मुलांना तर घरच्या शेतामध्ये फळझाडांच्या कलमांची, गुलाबाच्या कलमांची नर्सरी तयार करणे, फळबाग लावणे तसेच बाजारपेठ जवळ असल्यास फुलशेतीही करणे शक्य होते. 

कृषी विद्यापीठात प्रशिक्षण -
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापाठात माळी प्रशिक्षणासाठी अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यासाठी ५० जागा आहेत. प्रवेशासाठी नववीची गुणपत्रीका आणि शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. प्रवेश जाहिरात साधारणपणे मे च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com