मळणी यंत्रात हात अडकून तुटला; युवक गंभीर 

अनिल दंदी
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

यंत्रातील साफसफाईचे काम करत असताना अचानकपणे रवी बाबाराव अवातीरक या 25 वर्षीय युवकाचा उजवा हात यंत्रात अडकला. व यंत्राचे चाक फिरल्याने त्यामध्ये हात तुटून पडला.

बाळापूर (जि. अकोला) : हातात कडे घालून काम करणे युवकाला चांगलेच महाग पडले असून सोयाबीनची रास काढल्या नंतर मळणी यंत्राची साफ सफाई करतांना हात अडकल्याने त्यामध्ये हाताचा पंजा तूटून पडल्याची विचित्र घटना आज रवीवारी (ता. १५) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

रिधोरा शेत शिवारात मळणी यंत्राच्या साहाय्याने सोयाबीनची रास मळणी सुरू होती. मळणीनंतर यंत्रातील साफसफाईचे काम करत असताना अचानकपणे रवी बाबाराव अवातीरक या 25 वर्षीय युवकाचा उजवा हात यंत्रात अडकला. व यंत्राचे चाक फिरल्याने त्यामध्ये हात तुटून पडला.

काम करते वेळी सदर युवकाच्या हातात कडे असल्याने ते कडे सळई मध्ये अडकले. परीणामी युवकाला हात गमवावा लागला. जखमी अवस्थेत असलेल्या युवकाला लागलीच सर्वोपचार मध्ये दाखल करण्यात आले.