अकोल्याच्या महापौरपदी अग्रवाल; उपमहापौरपदी शेळके

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

अकोला - महापालिका निवडणुकीत भरघोस यश मिळविणाऱ्या भाजपचे विजय अग्रवाल यांनी अकोल्याचे सातवे महापौर होण्याचा मान मिळविला. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. उपमहापौरपदी भाजपच्याच वैशाली शेळके निवडून आल्या.

महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज मनपा सभागृहात सभा झाली. पीठासीन अधिकारीपदी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. हात वर करून निवडणूक घेण्यात आली. कॉंग्रेसने महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार कायम ठेवले होते. उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे विजय अग्रवाल यांनी कॉंग्रेसचे शेख मो. नौशाद श. युसूफ यांचा 49 विरुद्ध 17 मतांनी पराभव केला. भाजपची 48, तर अपक्षाचे एक मत अग्रवाल यांना मिळाले. कॉंग्रेस, भारिप-बमसंचे आणि कॉंग्रेस समर्थक एक अपक्ष उमेदवाराचे मत शेख मो. नौशाद यांना मिळाले. शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच आणि "एमआयएम'चा एक नगरसेवक तटस्थ राहिले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या वैशाली शेळके यांनी कॉंग्रेसच्या सुर्वणरेखा जाधव यांचा 49 विरुद्ध 17 मतांनी पराभव केला.

Web Title: akola mayor vijay agarwal