अकोला : ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून चालकाचा मृत्यू

रोजंदारीने शेत काम करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
Akola Murtijapur tractor Driver death under wheel of tractor
Akola Murtijapur tractor Driver death under wheel of tractorsakal

मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद येथे चालक म्हणून रोजंदारीने शेत काम करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा तो चालवित असलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाळी दबून मृत्यू झाला. ही घटना रविवारी, जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, पारत गावातील विश्वनाथ तायडे यांच्यात शेतात काम करण्यासाठी ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० झेड १२७३ वर चालक म्हणून रोजंदारीने गावातील संजय देवमन निमकांडे (४२) याला ठेवले होते. शनिवारी रात्री पाऊस झाल्याने शेत तयार करण्याकरिता त्याला शेतात ट्रॅक्टर घेवून पाठविले. तो शेतात ट्रॅक्टरने पंजी मारत असताना ट्रॅक्टरचे चाक शेतातील बुडईमध्ये फसले. त्यामुळे चालक ट्रॅक्टरवरून खाली पडला. त्यात त्याच्या वरून ट्रॅक्टर गेला. त्यात संजय देवमण निमकांदे हा गंभीर जखमी झाला. ही माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे अंमलदार संजय खंडारे घटना स्थळी दाखल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com