अकोला: ट्रक-रिक्षाच्या अपघातात ४ ठार, सहा जखमी

याेगेश फरपट
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

बुलडाणा जिल्ह्यातील बरेच मजूर कामासाठी बाळापूर जि. अकाेला येथे येतात. बुधवारी सकाळी रिक्षातून काही मजूर खामगावमार्गे येत हाेते. दरम्यान टेंभुर्णा फाट्याजवळ समाेरून येणाऱ्या ट्रकने रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षातील चार मजूर जागीच ठार झाले.

अकाेला : बुलडाणा येथून बाळापूरला कामासाठी जाणाऱ्या मजूरांच्या रिक्षाला (अॅपे) ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले, तर सहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील बरेच मजूर कामासाठी बाळापूर जि. अकाेला येथे येतात. बुधवारी सकाळी रिक्षातून काही मजूर खामगावमार्गे येत हाेते. दरम्यान टेंभुर्णा फाट्याजवळ समाेरून येणाऱ्या ट्रकने रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षातील चार मजूर जागीच ठार झाले.

रिक्षा पलटी झाल्याने आतील उर्वरीत सहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. खामगाव पाेलिसांनी वेळीच धाव घेत जखमींना उपचारार्थ खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले. ट्रकचालक फरार झाला असून पाेलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. अपघातातील जखमींची आेळख पटवणे सुरू असून मृतकांचे शवविच्छेदन सुरू आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :