वि. सा. संघाचे बालकुमार साहित्य संमेलन अकोल्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

अकोला - विदर्भ साहित्य संघाचे अकोला शाखा आयोजित पाचवे बालकुमार साहित्य संमेलन ता. १ व २ डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्‌स स्कूल परिसर, वाशीम रोड, अकोला येथे पार पडणार आहे. या संमेलनात दोन दिवस नामवंत लेखक व कवी, बालसाहित्यिक, सिनेकलावंत यांच्या सहभागाची रेलचेल राहणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. गजानन नारे यांनी रविवारी (ता. १९) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

शुक्रवार, १ डिसेंबर रोजी सकाळी भाषा गौरव दिंडीने संमेलनाचा प्रारंभ होत असून, विविध साहित्य दालनांचे उद्‌घाटन होईल. भाषा गौरव दिंडीमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी लोकसाहित्य ही मुख्य संकल्पना घेऊन सहभागी होतील. अ. भा. बालकुमार साहित्य संमेलन पुण्याच्या नियोजित अध्यक्षा डॉ. श्रीमती संगीता बर्वे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध बालसाहित्यिक शंकर कऱ्हाडे यांच्यासह मुंबई येथील सुप्रसिद्ध डबिंग व सिनेकलावंत मेघना एरंडे-जोशी, स्वागताध्यक्ष प्रा. ललित काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २ डिसेंबर रोजी सायंकाळी विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या बाल प्रतिनिधींसाठी ‘कॅम्प फायर’ राहणार आहे. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, बाल समुपदेशक डॉ. प्रदीप अवचार व कवी किशोर बळी हे धमाल मनोरंजन करणार आहेत.

Web Title: akola news balkumar sahitya sammelan