मसाला विक्रीच्या दुकानातून ‘विशाल’ची उद्याेग भरारी

याेगेश फरपट
शनिवार, 15 जुलै 2017

काय आहे स्पेशॉलीटी
लसण, अद्रक, लवंग, भेंडी इलायची, शहाजिरा, कलमी, जायफळ असे विविध मसाल्याचे पदार्थ मिळून लज्जतदार मसाला बनताे. जेवण्याची चव वाढवण्यात मसाल्याची किमया असल्याने दिवसाला १५ ते २० किलाे तर बुधवार व रविवारी ३५ ते ४५ किलाे मसाल्याची विक्री विशाल आेला मसाला केंद्रावरून हाेते. 

अकाेला : एकीकडे सरकारी नाेकरीची क्रेझ असतांना ती मिळवण्यासाठी जीवाचे रान करणारे आपण पाहताे. मात्र मिळालेल्या सरकारी नाेकरी साेडून स्वयंराेजगाराची कास धरत स्वतः साेबत पंधरा जणांना राेजगार मिळवून देण्याची किमया साधली. या ध्येयवेड्या ‘विशाल’ने छाेट्याशा दुकानातून आेला व गरम मसाल्याचा व्यवसाय सूरू केला आहे.

एक वेळ अशी हाेती की, ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नाेकरी’ समजल्या जायचे. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आज शिक्षण घेतलेला प्रत्येक युवक नाेकरी मिळवण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. यासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी आहे. मात्र याही परिस्थितीत नाेकरीला झुगारून विशाल लाड या तरूणाने अल्पशा भांडवलावर आपला स्वयंराेजगार सुरू केला आहे. विशाल लाड यांचे शिक्षण बारावी झाले असून त्यांनी कृषी पदवीका, माळी ट्रेनिंग, टायपींग, संगणक, ड्रायव्हींग असे विविध अभ्यासक्रम पुर्ण केले. नाेकरी करून देशसेवा करायची असे विशालचे सुद्धा स्वप्न हाेते. म्हणून अभ्यासाला सुरवात केली. जिल्हा परिषदेत सात वर्षापूर्वी ग्रामसेवक म्हणून नाेकरीही लागली. पण पगार २५०० रूपये. एवढ्या कमी पगारात नाेकरी करायची नाही असे ठरवून पुढचे प्रयत्न सुरू ठेवले. उदरनिर्वाह चालावा यासाठी महापालिकेच्या एलबीटी टाेलनाक्यावर काम केले. याठिकाणी १२ तास काम करावे लागायचे. १५०० रूपयात दिवस अन रात्र काम करण्याच काही अर्थ नाही असा विचार मनात आला अन नाेकरी क्षणात साेडली. आता काय करायचे हा प्रश्न समाेर हाेता. काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. म्हणून मसाल्याचा उद्याेग सुरू केला. आेला मसाला व गरम मसाला असे दाेन प्रकार त्यात ठेवले. जसजसे दिवस पालटले तशी मसाल्याची मागणीही वाढू लागली. गजाननाच्या कृपेने आज माझ्यासह पाच ते सहा कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मी साेडवू शकलाे याचे समाधान असल्याचे विशाल लाड यांनी सांगितले. 

काय आहे स्पेशॉलीटी
लसण, अद्रक, लवंग, भेंडी इलायची, शहाजिरा, कलमी, जायफळ असे विविध मसाल्याचे पदार्थ मिळून लज्जतदार मसाला बनताे. जेवण्याची चव वाढवण्यात मसाल्याची किमया असल्याने दिवसाला १५ ते २० किलाे तर बुधवार व रविवारी ३५ ते ४५ किलाे मसाल्याची विक्री विशाल आेला मसाला केंद्रावरून हाेते. 

नाेकरीची अपेक्षा ठेवणे वाईट नाही. लागली तर ठिकच आहे. पण नाेकरी लागली नाही म्हणून निराश न हाेता छाेटासा व्यवसाय थाटला तरी काही दिवसात त्याचा विस्तार नक्की हाेताे. त्यामुळे बेराेजगार युवकांनी लघूउद्याेग थाटून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- विशाल लाड, मसाला विक्रेता

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :