अकोला: पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात १०८ तक्रारी

विवेक मेतकर
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुरू केलेल्या जनता दरबारात साेमवारी (ता. ६) नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित १०८ तक्रारी पालकमंत्र्यांना दिल्या. संबंधित तक्रारींचे शासकीय यंत्रणांनी १५ दिवसांत निवारण करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या तक्रारींचे संबंधित विभागांनी तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक साेमवारी जनता दरबार आयाेजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर्गत साेमवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लाेकशाही सभागृहात सकाळी ११ वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारचे आयोजन करण्यात आले. जनता दरबारात पालकमंत्र्यांकडे नागरिकांनी जिल्हा परिषदेबाबत ३०, पोलिस विभाग दहा, कृषी सात, महानगर पालिका आठ, नगरपालिका तीन, महसूल ४२ आणि विद्युत विभागाशी संबंधित आठ अशा एकूण १०८ तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींची त्वरीत दखल घेवून त्याचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आस्त‍िककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी एस. रामामूर्ती, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.