अकोला: आसिफ खानचे रेशन दुकान निलंबित 

Ration Shop
Ration Shop

अकोला : बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा व मेहकर महसूल विभागाच्या पथकाने चिखली येथून वाशीमकडे जाणारा लव्हाळा फाट्यावर २० टन गहु पकडला. यामध्ये बुलडाणा पोलिसांनी वाडेगावमध्ये राहणारा आसिफ खान मुस्तफा खान याला ताब्यात घेतले होते. या कारवाईचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होताच जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी त्याचे दुकान तपासणीचे आदेश बाळापूर तहसीलदारांना दिले. त्यांनी दिलेल्या अहवालावरून त्याचे दुकान अखेर पुरवठा अधिकाऱ्यांनी अनिश्‍चित काळासाठी निलंबित करण्याचे आदेश सोमवारी दिलेत. 

बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांनी ट्रक क्र. एमएच - ३७ जे - ४६६३ ने सार्वजनिक वितरण प्रणालीचा २० टन गहू घेऊन वाशीमकडे जाणारा ट्रक पकडला. पोलिसांनी एकूण २५ लाख ६१ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये पोलिसांनी मो. फारूख मो. इब्राहीम, वाजीद मिर्झा युसुफ मिर्झा, अलताफ अजीज कच्छी, लक्ष्मण उर्फ प्रकाश सखाराम कुडके यांना अटक केली. दरम्यान, या चौघांच्या मोबाईलचा कॉलडाटा पोलिसांनी काढल्यानंतर त्यामध्ये सतत काही व्यक्तीच एकमेकांमध्ये संभाषण करताना आढळून आल्यात. पोलिसांनी या कॉलडाटावरून वाडेगावातील आसिफ खान याला ताब्यात घेतले होते. मेहकर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आसिफ खान मुस्तफा खान याच्याकडे शालेय पोषण आहारातील तांदळाची वाहतूक करण्यासाठी पातूर, बाळापूर, तालुक्यातील काम अनेक वर्षांपासून आहे.

त्याआधारेच वाडेगावातील गोदामासह पातूर आणि मेहकर तालुक्यातील सिमावर्ती गावांतून तांदळाचा काळा बाजार करण्याचे रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘सकाळ’ २९ सप्टेंबरला प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी बाळापूर तहसीलदार दीपक पुंडे यांना आसिफ खानच्या राशन दुकानाची चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानंतर बाळापूर तहसीलदारांनी त्याच्या दुकानाची तपासणी केली. या अहवालामध्ये त्याच्या दुकानात तांदुळ व गव्हाचा साठा कमी मिळून आला आहे. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी त्याला त्याचे म्हणणे एेकूण घेण्यासाठीही संधी दिली होती. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी बाळापूर तहसीलदारांच्या अहवालावरून त्याचे रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र पुढील चौकशीपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रास्तभाव दुकानदाराने माहे सप्टेबर २०१७ मध्ये किती अन्नधान्याची उचल केले व किती धान्याचे वाटप शिधापत्रिकाधारकांना केले, याबाबतही अहवाल मागविला आहे. 

शिधापत्रिकाधारकांची नजीकच्या दुकानात व्यवस्था करा
आसिफ खान याच्या रास्त भाव दुकानातील अन्नधान्याच्या उजलबाबत २५ टक्के शिधापत्रिकाधारकांचे बयाण घेऊन त्यांना शासन निर्धारित दराने व ठरवून दिलेल्या माणकाप्रमाणे शिधावस्तूचे वाटप केले किंवा नाही याची चौकशी करून स्वयंमस्पष्ट अहवाल एक महिन्यात सादर करण्याचेही अादेश दिले. तसेच त्याच्या दुकानातील शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून बाळापूर तहसीलदारांनी नजीकच्या रास्तभाव दुकानास जोडून त्यांना शिधावस्तूचे वितरण नियमीतरित्या होईल, यादृष्टीकोणातूनही पुढील कारवाईचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी दिले आहेत.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com