राज्यस्तरीय वकीलांच्या क्रिकेट स्पर्धेत खामगावसंघ ठरला उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

खामगाव: अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय वकीलांच्या क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर संघ विजयी झाला असून खामगाव वकील संघ उपविजेता ठरला आहे.

खामगाव: अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय वकीलांच्या क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर संघ विजयी झाला असून खामगाव वकील संघ उपविजेता ठरला आहे.

अकोला येथील वकिलांनी आयोजित केलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण 16 जिल्हा वकील संघानी भाग घेतला होता. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, नांदेड, बीड, खामगाव, हिंगोली आदि संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत खामगाव वकील संघाने दमदार भागीदारी नोंदविली. खामगाव वकील संघाने पहिल्या सामन्यात बीड संघाचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात नांदेड संघला मात देत उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश केला. उपांत्यपूर्व सामना हा बलाढ्य पुणे संघाशी होता. सदर सामन्यात खामगाव संघाने पुणे संघाचा दारूण पराभव करीत उपांत्य सामन्यात धडक दिली.

उपांत्य सामना सुद्धा औरंगाबाद सारख्या मजबूत संघाशी होता. त्या सामान्यमध्ये खामगाव संघाने मोठा विजय संपादित केला व अंतिम सामना गठला. रविवारी खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सुद्धा खामगाव संघाचा निसटता पराभव झाला व खामगाव वकील संघ सदर राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेता ठरला. सदर स्पर्धेत खामगाव संघ सलग 5 दिवसात 5 सामने खेळला हे उल्लेखनीय.

सदर स्पर्धेत खामगाव वकील संघातर्फे कर्णधार दिलीप देशमुख, शेखर जोशी, उदय आपटे, प्रविण परदेसी, दिपक माळवंदे, अरशद, सनी परदेसी, अनिल सरदार, अशोक इंगळे, आबिद, ऋषिकेश देशमुख, जयंत पाटिल, तरुण मोहता, रविंद्र भोजने आदि वकिलांनी मोलाची कामगिरी निभावली. दिलीप देशमुख यांना बेस्ट यस्टिरक्षक तर अरशद याला बेस्ट बॉलर चा पुरस्कार मिळाला. खामगाव वकील संघाला अरुण टापरे, एम. बी. फिरके, शंकर बिहाडे, अजय आळसी, अभय मुंढे, हिंगणे साहेब, मनदीप सिंग, बाबु भट्टड, प्रशांत लाहुडकर, नितिन सांगले, देवेंद्र टिकार,अनिल चांडक, राजेश गवई, राजा साहेब, शेख साहेब, इलियास, अजहर सह खामगाव वकील संघाच्या सर्व वकीलांची समर्थ साथ मिळाली. खामगाव वकील संघ सुद्धा लकवकरच खामगाव येथे राज्यस्तरीय सामान्यांचे आयोजन करणार आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :