डॉक्टरांच्या कायदे विषयक समस्या साेडवण्यासाठी प्रयत्न करू: सुप्रिया सुळे

सुगत खाडे
मंगळवार, 20 जून 2017

संसदेत व संसदेच्या बाहेर सरकारच्या निर्णयावर नेहमीच राजकीय पक्ष टीका करतात. परंतु काही धाेरणात्मक व चांगल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राजकीय पक्ष मतभेद विसरून काम करतात, हे सांगण्यासाठी सुप्रिया सुळेंनी संसदेत नुकतेच ‘मेंटल हेल्थ बिल’ मंजूर करण्याच्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मतदान केल्याची माहिती दिली.

अकाेला - वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना डॉक्टरांना विविध प्रकारच्या कायदेविषयक समस्यांना सामाेरे जावे लागते. या कायदे विषयक समस्या साेडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निश्चितच प्रयत्न करेल, असे आश्वासन राकांपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. त्या मंगळवारी (ता. २०) सकाळी १० वाजता स्थानिक आय.एम.ए. सभागृहात आयाेजित डाॅक्टरांच्या संवाद कार्यक्रमात बाेलत हाेत्या.

यावेळी मंचावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, डाॅ. आशा मिरगे, आयएमएचे पुरूषाेत्तम तायडे, डाॅ. रणजीत देशमुख उपस्थित हाेते. कार्यक्रमात बाेलतांना पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असतांना डाॅक्टरांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या हाेत्या. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पुढाकार घेवून डाॅक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर तत्काळ अजामीन पात्र गुन्हे दाखल करण्याचा कायदा सर्वात आधी राज्यात लागू केला. त्यानंतर राज्यात स्त्री भ्रूण हत्येचा विषय चर्चेला आला. त्यासाठी डाॅक्टरांना दाेषी ठरवण्यात आले. परंतु ते चूकीचे हाेते. सद्याच्या युगात डाॅक्टर कमर्शिअल असल्याचा आराेप लागण्यात येत आहे. परंतु डाॅक्टर शिबिरांच्या माध्यमातून माेफत सेवा देतात, हे नागरिक विसरतात. त्यामुळे नागरिकांनी डाॅक्टरांच्या सामाजिक कार्याची सुद्धा जाण ठेवणे आवश्यक असल्याचे मत सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केले.

संसदेत व संसदेच्या बाहेर सरकारच्या निर्णयावर नेहमीच राजकीय पक्ष टीका करतात. परंतु काही धाेरणात्मक व चांगल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राजकीय पक्ष मतभेद विसरून काम करतात, हे सांगण्यासाठी सुप्रिया सुळेंनी संसदेत नुकतेच ‘मेंटल हेल्थ बिल’ मंजूर करण्याच्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मतदान केल्याची माहिती दिली. त्याचबराेबर परदेशातील डाॅक्टरांपेक्षा स्वदेशी डाॅक्टर अधिक चांगले असल्याचे मत व्यक्त केले. मुंबई सारख्या शहरात फॅमिली डाॅक्टरची कॉन्सेप्ट संपल्याची खंत सुद्धा त्यांना यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमात डाॅ. आशा मिरगे व आयएमएच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा विचार व्यक्त केले. त्यांनतर उपस्थित डाॅक्टरांनी सुप्रिया सुळेंकडे त्यांच्या समस्या मांडून त्या साेडवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. शहनाज खान तर आभार प्रदर्शन डाॅ. विनय वाघ यांनी केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
काय आहे 'मुख्यमंत्री फेलोशिप'? माहिती घ्या 'सकाळ'च्या व्हिडिओतून​
हैद्राबाद बॅंकेने नाकारला शेतकऱ्यांना अग्रीम​
दलितांची कर्जे माफ करावीत : रामदास आठवले​
घोषणांच्या पावसात शेतकरी कोरडाच
पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय?
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST​
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले​
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक​
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या​
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी