'सकाळ' वऱ्हाड आवृत्तीचा वर्धापन दिन थाटात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

अकोला - "सकाळ' वऱ्हाड आवृत्तीचा प्रथम वर्धापन दिन बुधवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात उत्साहात साजरा झाला. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या वऱ्हाडातील असामान्य व्यक्तिमत्त्वांना या वेळी गौरविण्यात आले. "नक्षत्रनाद' या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद वाचक रसिकांनी लुटला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे होते. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशाताई मिरगे, "सकाळ' माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक "सकाळ' वऱ्हाड आवृत्तीचे सहयोगी संपादक संदीप भारंबे यांनी आवृत्तीच्या वाटचालीबाबत माहिती दिली.

या वेळी प्रभात किड्‌सचे संचालक डॉ. गजानन नारे व सौ. वंदना नारे, बुलडाणा अर्बनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुकेश झंवर व कोमल झंवर, अस्पायरचे संचालक सचिन बुरघाटे व प्राजक्ता बुरघाटे, डॉ. कैलाशचंद्र दागडिया व उज्ज्वला दागडिया, निर्माण फर्टिलायझरचे संचालक गणेश देशमुख व जयश्री देशमुख, युवाराष्ट्र संघटनेचे धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, डॉ. नीलेश पाटील, गायिका रसिका बोरकर व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: akola sakal office birth anniversary celebration