वरवंट्याने केला पतीने पत्नीचा खून

वरवंट्याने केला पतीने पत्नीचा खून

अकोला - पत्नीच्या चारित्र्यावरून व नातवाइकांविरोधात तक्रार देण्यास नकार देणाऱ्या पत्नीची पतीने वरवंटा डोक्‍यात घालून घरात खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी कृषिनगरात घडली. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आरोपी रमेश सोनाजी तायडे याला अटक केली आहे.

कृषिनगरात राहणारा तायडे (47) हा पत्नी कविता (45) व दोन मुली व एक मुलगा यांच्यासोबत राहतो. तो गवंडी काम करतो. त्याच्या दोन्ही मुलींचा विवाह झालेला आहे. जय (16) नावाचा मुलगा हा शिक्षण घेत आहे. तायडे हा पत्नी कविताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून तो तिच्याशी नेहमीच भांडायचा. तो नातेवाइकांविरोधात तक्रार देण्यावरूनही तिच्याशी नेहमी वाद घालत होता. त्या दोघांमध्ये गुरुवारी रात्री या दोन्ही कारणांवरून वाद झाला होता. आज त्याने रागाच्या भरात घरात असलेला वरवंटा पत्नीच्या डोक्‍यात घातला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com