अकोल्यात युवकाकडून 42 ग्रॅम कोकेन जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

अकोला - गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करीत 42 ग्रॅम कोकेन जप्त करीत विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (वय 19 ; रा. गुलजारपुरा, जुने शहर) या युवकास अटक केली. त्याच्याकडून कोकेनसह दोन लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस तपासामधून त्याच्याकडून खरेदीदारांचा शोध घेत आहेत. अकोल्यात पहिल्यांदाच कोकेन जप्त करण्यात आले.