आत्महत्याग्रस्तांच्या पाल्यांना मोफत शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

अकोला - वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाचा भार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा व तालुका केंद्रातच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होतो. अनेकांना मध्येच शिक्षण सोडावे लागते. त्यामागे आर्थिक परिस्थिती हे एक कारण आहेच. अशा पाल्यांना मुक्त विद्यापीठाने मोफत शिक्षण देण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडणारे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करून आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल.