अकोल्याचा अथर्व अंडर १९ भारतीय क्रिकेट संघात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

अकोला - अकोला क्रिकेट क्लबचा सलामीला खेळणारा शैलीदार फलंदाज अथर्व तायडेची श्रीलंगा दौऱ्यासाठी अंडर १९ भारतीय क्रिकेट संघात वर्णी लागली आहे.

अथर्वने यापूर्वी विदर्भ संघाने अथर्व तायडेच्या नेतृत्वात बी.सी.सी.आय. अंतर्गत १९ वर्षाखालील स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला असून, अथर्व ने ३२० अशी मोठी धावसंखेची खेळी केली आहे. तसेच १४,१६ व १९ वर्षाखालील विदर्भ संघाचे नेतृत्व केले आहे. १९ वर्षाखालील चालेन्जर ट्रॉफी मध्येपण उत्कृष्ट शकतीय खेळी खेळली आहे. 

तसेच मलेशियायेथे झालेल्या आशिया कपसाठी देखील अथर्वने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षी झालेल्या इराणी ट्रॉफीमध्ये सुद्धा त्याने विदर्भ संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. अथर्वची निवड अकोला क्रिकेट क्लबसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील युवा क्रिकेट खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याची माहिती व्ही.सी.ए.चे जिल्हा संयोजक तथा अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी दिली.

Web Title: Akola's atharva tayde selected for Under-19 Indian Cricket Team