दारूचा वाद विकोपाला; वृद्धाला जाळले, जाळून मारले की मारून जाळले?

Murder crime
Murder crimeMurder crime

आर्वी (जि. वर्धा) : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने तिघांनी वृद्धाला जिवंत (old man was killed) जाळले. यात वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आर्वी तालुक्यातील नांदपूर येथे सोमवारी (ता. २८) घडली. अभिमान पखाले (वय ६७) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे अभिमान पखाले यांनी महिनाभरापूर्वी घर सोडले होते. ते गावातील बबलू मारोती पखाले यांच्या घरी काम करून राहत होते. आज मारोती पखाले यांच्या घरी दारूच्या पार्टीचे (Alcohol) आयोजन केले होते. दरम्यान, पैशाच्या कारणावरून झालेल्या वादात प्रमोद दाहट, मारोती पखाले, धर्मा पखाले यांनी अभिमान पखाले यांचा खून करून मृतदेह जाळला.

Murder crime
आता दारू पिल्यावर पकडल्यास होणार नाही अटक; द्यावी लागेल ही माहिती

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे पाठविला. या प्रकरणी आर्वी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी संशयित प्रमोद दाहट, मारोती पखाले, धर्मा पखाले यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे करीत आहेत.

जाळून मारले की मारून जाळले?

नांदगाव येथे पखाले यांच्या घरी मिळालेला मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला. त्यांना जाळून मारले (murder) की मारून जाळले, हे अद्याप अस्पष्ट आहे. नेमके काय हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळू शकेल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Murder crime
साळींदरसोबतच्या झटापटीत बिबट्याचा मृत्यूड; तब्बल १७ काटे आढळले

घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

वृद्धाला जाळून मारल्याच्या या घटनेने गावात खळबळ माजली आहे. पुन्हा कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पैशाच्या कारणावरून झालेल्या वादात (Alcohol) हा खून करण्यात आला आहे. जाळून मारले की मारून जाळले, हा तपासाचा भाग आहे. घटनास्थळी केलेल्या पाहणीवरून प्रथम गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर आत्महत्या दाखविण्यासाठी त्याला जाळले असावे, असे दिसून येत आहे.
- यशवंत सोळंखी, अपर पोलिस अधीक्षक, वर्धा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com